Indian Idol Marathi : इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर चैतन्यची स्वप्नपूर्ती, लवकरच पार्श्वगायनाचं स्वप्न पूर्ण होणार

मालिका-ए-रोज
Updated Jan 10, 2022 | 17:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Idol Marathi :इंडियन आयडॉल मराठीच्या मंचला आता टॉप 10 स्पर्धक मिळालेले आहेत. त्यामुळे आता कोण जिंकणार? आणि कोणाचं स्वप्न भंग होणार हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच.

Chaitanya's dream come true on Indian Idol Marathi stage.
इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आळंदीच्या चैतन्य देवढेला लागली लॉटरी
  • इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर स्पर्धकांची स्वप्नपूर्ती
  • धमाकेदार परफॉर्मन्से जिंकली परीक्षकांची मनं

Indian Idol Marathi top 10 : सोनी मराठीवर सुरु असलेल्या इंडियन आयडॉल मराठी या रिएलिटी शोमध्ये आता टॉप 10 स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. या मंचाला आता टॉप 10 स्पर्धक मिळालेले आहेत. सारेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स करत आहेत. त्यामुळे आता सुरांची बरसात, सुरांची चढाओढ स्पर्धेत दिसत आहे. त्यामुळे आता कोण विजेतेपद जिंकणार याची प्रेक्षकांप्रमाणेच परीक्षकांनाही उत्सुकता आहे. अजय-अतुल ही लोकप्रिय संगीतकार जोडी या स्पर्धेचं परीक्षण करत आहे. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. यातलं एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे. मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण खरी करणारा हा स्पर्धक. आळंदीचा असल्याने चैतन्य माऊली या नावाने इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर ओळखला जातो. हा मंच स्पर्धकांची स्वप्न पूर्ण करणारा म्हणून ओळखला जातो. मग कधी कुणाचं अभिनयाचं स्वप्न पूर्ण होतं, तर कधी कुणाला गायनाची संधी मिळते. आता लवकरच चैतन्यचंही पार्श्वगायन करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 

चैतन्यला गाण्याची ऑफर देण्यात आली आहे. 

ऑडिशन राऊंडपासून एकाहून एक सरस गाणी सादर करत चैतन्यने परीक्षकांचं मन जिंकलं आहे. सूर, ताल, लय याचं उत्तम ज्ञान असलेल्या चैतन्यने नेहमीच आपल्या गायिकीने परीक्षक पाहुण्यांचंही मन जिंकलं आहे. खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धकांनाही आपलंस केलं आहे. सिनेइंडस्ट्रीतल्या एका कलाकाराने अजय गोगावले यांना फोन करून चैतन्यला गाण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता लवकरच चैतन्यचं पार्श्वगायनाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तेव्हा आता चैतन्यच्या दमदार आवाजातील गाणं ऐकण्यासाठी जस्ट वेट अँड वॉच. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी