Top 5 Webseries : कुटुंबासोबत पाहा या 5 उत्तम वेबसीरिज, या कौटुंबिक वेबसीरिजचा आनंद लुटा

मालिका-ए-रोज
Updated Jun 05, 2022 | 11:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Top 5 Web series :अशा काही वेबसीरिज आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून आनंद घेऊ शकता. या वेबसीरिज कुटुंबाच्या कथेवर आधारित आहेत.

Check out these 5 great web series with family, enjoy this family web series
कौटुंबिक वेबसीरिजचा आनंद लुटा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या कौटुंबिक वेबसीरिजचा आनंद लुटा
  • तुमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या वेबसीरिज
  • पंचायत, होम, ये मेरी फॅमिली अशा एकाहून एक सरस वेबसीरिज

Top 5 Web series : आजकाल बॉलीवूड चित्रपटांपेक्षा जास्त लोकं घरात बसून वेबसीरिज पाहण्याला प्राधान्य देत आहेत. यामुळेच Netflix, Voot, Amazon Prime, Hotstar सारखे अनेक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म सातत्याने वेबसीरिजच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत आहेत. यापैकी काही वेबसीरिज अशा आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून आनंद घेऊ शकता. या वेबसीरिज कौटुंबिक कथेवर आधारित आहेत. आज आम्ही तुम्हाला कुटुंबावर आधारित 5 सर्वोत्तम वेब सीरिज सांगणार आहोत. 


Gullak (गुल्लक )


गुल्लक ही एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे ज्यात आई-वडील आणि त्यांची दोन मुले आहेत. 3 भागात बनलेली ही वेबसीरिज तुमच्या काही जुन्या आठवणी नक्कीच ताज्या करेल. या वेब सिरीजमध्ये एक  प्रेमळ आई, वडील आणि एकमेकांशी भांडणारी पण तरीही प्रेम करणारी भावंडं आहेत.तुम्हाला असे असंख्य कौटुंबिक क्षण सापडतील जे तुम्हाला तुमच्या भूतकाळात घेऊन जातील. या वेब सिरीजमधील पात्रे अतिशय सरळ आहेत आणि त्यांच्या कथा आपल्याच आहेत. पिग्गी बँकेप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक लहान-मोठा क्षण या वेबसिरीजमध्ये सामावलेला आहे. कुटुंबातील एकतेचा संदेश देणारी ही सीरिज आहे.

अधिक वाचा : ४० वर्षांत हिमालयातील ग्लेशियर ३.९ लाख हेक्टरने झाले कमी


Panchayat (पंचायत)

पंचायत ही एक कौटुंबिक कॉमेडी वेबसीरिज आहे. ही वेबसीरिज गावावर आधारित आहे ज्याची कथा कुटुंबाभोवतीच फिरते. या वेबसीरिजमध्ये शहरी मुलगा अभिषेक त्रिपाठीची कथा दाखवण्यात आली आहे, जो पंचायत सचिव म्हणून गावात पोहोचतो. अशा स्थितीत या शहरी मुलाला गावातील शासकीय कार्यालयात कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, हे अतिशय मजेशीर पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या वेबसीरिजमधील रघुवीर यादव आणि नीना गुप्ता यांची पात्रे अतिशय कौटुंबिक आणि अद्भुत आहेत जी तुम्हाला तुमच्यातील वाटतील. आजच्या व्यस्त जीवनात तुम्हाला कुटुंबासोबत काही खास क्षण घालवायचे असतील, तर तुम्ही कुटुंबासोबत पंचायत वेब सीरिज पाहू शकता. 
त्याचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे.

अधिक वाचा : या 25 पैशांच्या शेअरने केले एक लाखाचे 2 कोटी

Home (होम)

'होम' ही एक भावनिक रोलर कोस्टर राईड आहे. कुटुंबासह पाहण्यासाठी ही सर्वोत्तम कौटुंबिक वेब सीरिज आहे. शोमध्ये भारतीय कुटुंबातील अनेक सुंदर क्षण दाखवण्यात आले आहेत. शोची कथा कुटुंबातील मूल्यांवर आधारित आहे, परंतु त्यांना एक निष्कासन नोटीस मिळते ज्यामुळे त्यांचे जग उलटे होते.एकदा तुम्ही वेबसीरिज पाहायला सुरुवात केली की,तुम्ही स्वत:ला रोखू शकणार नाही. अल्ट बालाजीवर रिलीज झालेल्या या वेब सीरिजमध्ये अन्नू कपूर मुख्य भूमिकेत आहे.

Ye Meri Family (ये मेरी फॅमिली)

TVF Play, Netflix आणि YouTube वर ये मेरी फॅमिली ही अशीच एक वेब सिरीज आहे जी तुम्हाला नक्की आवडेल. ही वेबसिरीज पाहून तुम्हाला वाटेल की तुमच्याच कुटुंबावर बनलेली कथा पडद्यावर येत आहे. ही वेबसीरिज तुम्हाला 90 च्या दशकात घेऊन जाईल. खरं तर ही वेबसीरिज ९० च्या दशकावर आधारित आहे. या वेबसीरिजमधये एक कुटुंब दाखवले आहे ज्यात आई-वडील आणि तीन मुले आहेत. संपूर्ण कथा मधल्या मुलाभोवती फिरते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपासून ते शिक्षकांनी दिलेला ओरडा, आणि त्यानंतर जिवलग मित्रासोबत घालवलेले क्षण असे अनेक अविस्मरणीय क्षण या मालिकेत दाखवण्यात आले आहेत, जे तुमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतील.

अधिक वाचा : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून महिना ठरेल आनंदाचा


चाचा विधायक हैं हमारे

चाचा विधायक है हमारे चे दोन सिझन रिलीज झाले आहेत. OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर ही वेबसीरिज रिलीज झालेली आहे.  ही वेबसीरिज इंदूरमधील रहिवासी असलेल्या रॉनी भैयाची कथा दाखवते,जो एक उदार व्यक्ती आहे पण इतरांना मदत करताना नेहमी अडचणीत सापडतो. या वेबसीरिजमध्ये झाकीर खान मुख्य भूमिकेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी