CID to return : CID पुन्हा स्मॉल स्क्रीनर दाखल होणार? 'या' फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मालिका-ए-रोज
Updated Nov 10, 2022 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

CID to return : सीआयडीचे (CID) एसीपी प्रद्युम्न अर्थातच शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी त्यांचे सहकलाकार दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव आणि निर्माते बीपी सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सीआयडी ही मालिका स्मॉल स्क्रीनवर दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

CID to return on small screen post viral on socaial media
'CID' स्मॉल स्क्रीनवर पुन्हा दाखल होणार?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुन्हा एकदा 'CID' स्मॉल स्क्रीनवर येणार?
  • सीआयडी सुरू करण्याची चाहत्यांची मागणी
  • पुन्हा एकदा प्रद्युमन, दया आणि अभिजीत गाजवणार स्मॉल स्क्रीन?

CID to return : सीआयडीचे (CID) एसीपी प्रद्युम्न अर्थातच शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी त्यांचे सहकलाकार दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव आणि निर्माते बीपी सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सीआयडी ही मालिका स्मॉल स्क्रीनवर दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (CID to return on small screen post viral on socaial media)


'दया तोड दो ये दरवाजा'हे वाक्य पुन्हा एकदा घराघरातून ऐकायला येणार असंच सध्या वाटतंय. टेलिव्हिजनरील प्रदीर्घ काळ चालणाऱ्या शौपेकी एक म्हणजे सीआयडी ही मालिका. या मालिकेने काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, आजही ही मालिका या मालिकेतील एसीपी प्रद्युमन, दया आणि अभिजीत ही पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सुमारे 21 वर्ष स्मॉल स्क्रीन गाजवणारा हा शो 2018 ला अचानक बंद झाला. प्रेक्षकांनी या शोला भरभरून प्रतिसाद दिला. या मालिकेती प्रत्येक पात्र, प्रत्येक एपिसोडला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आणि म्हणूनच की काय, शिवाजी साटम यांनी त्यांच्या या सीआडी गँगसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा चाहते भावूक झाले. 

अधिक वाचा : मलायका-अर्जुनचा शुभविवाह?

शिवाजी साटम यांनी या शोचे निर्माते बीपी सिंह यांच्यासह तिन्ही कलाकारांचा फोटो ट्विट केला आहे. “#the GANG of CID with Big Daddy BP  ❤️  ,” अशी कॅप्शनही त्यांनी फोटोला दिली आहे. फोटोमध्ये, त्या सर्वांचा कॅज्युअल अटायर दिसत आहे,  त्यांनी कॅमेर्‍यासमोर पोझ दिली आहे. या फोटोवर ‘Love’ असेही लिहिलेले होते. 

चाहत्यांनी ट्विटरवर या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, "परत या, पुन्हा एकदा परत या". तर दुसऱ्याने म्हटले आहे, "तुम्हा सर्वांना एकत्र पाहून खूप आनंद झाला. missing u a lot". तर अजून एकाने लिहिले आहे. "हा शो परत आणा" 

अधिक वाचा :  'बिग बॉस'च्या घरातून 'या' सदस्याची हकालपट्टी?

1997 मध्ये सीआयडी हा क्राईम शो सुरु झाला. एसीपी प्रद्युमन (Shivaji satam), दया (Dayanand shetty), अभिजीत (Aaditya Shrivastav), आणि फ्रेडी (Dinesh Fadnis), यांनी स्मॉल स्क्रीनवर धुमाकूळ घातला होता. CID चेपंधाराशेहून अधिक एपिसोड प्रसारित झाले. 

अधिक वाचा : रात्रीच्या जेवणात ‘या’ पाच गोष्टी विषासमान

2020 मध्ये लॉकडाऊनमध्ये सीआडीच्या मेकर्सनी हा शो री टेलिकास्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाही शो पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. 
काही मीडिया रिपोर्टनुसार, सीआयडीच्या नव्या सीझनमध्ये जुनीच स्टारकास्ट दिसणार आहे. एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स, दया, अभिजीत, फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. साळुंखे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येणार असल्याची चर्चा सध्या टीव्ही वर्तुळात रंगत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी