Big Boss Marathi 4 : पुन्हा भरणार महेश सरांची शाळा, बिग बॉसचा 4 था सीझन लवकरच; Watch promo

मालिका-ए-रोज
Updated Aug 28, 2022 | 15:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची (Big Boss Marathi season 4)प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सीझन लवकरच सुरू होणार आहे. नुकताच त्याचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला. कोण स्पर्धक असणार? यंदाच्या सीझनमध्ये महेश सर (Mahaesh Manjarekar) स्पर्धकांची कशी शाळा घेणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. चौथा सीझन कधी सुरू होणार जाणून घेऊया.

Big Boss Marathi 4 th Season soon watch new promo
पुन्हा भरणार महेश सरांची शाळा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 25 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू होण्याची शक्यता
  • महेश सरांचा न्यारा अंदाज, पुन्हा भरणार शाळा
  • नवा सीझन, तगडे स्पर्धक, आणि नवी धमाल

Big Boss Marathi 4 : स्मॉल स्क्रीनवरचा सर्वात गाजलेला आणि सगळ्यात जास्त टीआरपी रिएलिटी शोम्हणजे बिग बॉस मराठी (Big Boss Marathi season 4) या रिएलिटी शोचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा या शोचं सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. मराठीतला आघाडीची अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आता या सगळ्यावर पडदा पडलाय. नुकत्याच आलेल्या बिग बॉस मराठी 4 च्या नव्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकरच (Mahesh Manjarekar ) सूत्रसंचालन करणार असल्याचं स्पष्ट झालंय. तेव्हा पुन्हा एकदा महेश सरांची शाळा भरणार हे तर नक्की. त्यामुळे आता उत्सुकता आहे की नवा सीझन नक्की कधी सुरू होतोय. (Colors Marathi reality show Big Boss Marathi 4 th Season upcoming soon watch new promo)

अधिक वाचा : सोनं हरवल्यास का समजतात अशुभ

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकरांचा स्वॅग दिसतो. महेश मांजरेकर प्रोमोमध्ये म्हणतायत, 'हिची ना कायम किरकीर असते, हा किती भांडतो, सर ना तिच्यावर कायम चिडतात, हा सरांचा फेव्हरेट आहे. ही माझी नाही तुमची मत आहेत.  बिग बॉस मराठी 4 सुरू होतंय. तुमची मत तयार ठेवा'. हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढलेली असणार. आता या नव्या सीझनमध्ये स्पर्धक कोण असणार? हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. 

एवढं सगळं जरी असलं तरी नवा सीझन कधी सुरू होतोय? याबाबतची उत्सुकता कायम आहे. याआधीही या नव्या सीझनचे प्रोमो रिलीज झालेले आहेत. पण नेमकी तारीख अद्यापही समजलेली नाही. आता थोडसं डोक्याला चालना दिली तर तुम्हीही सहज अंदाज लावू शकता सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेला सूर नवा ध्यास नवा हा रिएलिटी शो अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. त्यामुळे आता 25 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठी 4 चा नवा सीझन सुरू होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : भारत वि. पाकिस्तान मॅचमध्ये खेळणार हे खेळाडू

एकूणंच काय तर नव्या सीझनमध्ये फूल टू राडा, एकमेकांची उणीदुणी, भांडण पाहायला मिळणार हे नक्की. तर इथे महेश मांजरेकरांचा स्वॅग पाहता ते नव्या स्टाईलने, नव्या जोमाने स्पर्धकांची शाळा घ्यायला सज्ज झालेत. बिग बॉसच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे होती, दुसऱ्या सीझनचा विजेता होता शिव ठाकरे ते तिसरा सीझन गाजवला होता तो विशाल निकमने. तेव्हा आता हा सीझन कोण गाजवणार याचीच उत्सुकता आहे. सो जस्ट वेट अँड वॉच.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी