Kapil Sharma Birthday: इतक्या संपत्तीचा मालक आहे कपिल शर्मा, खरेदी केलीय सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन

मालिका-ए-रोज
Updated Apr 02, 2021 | 12:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

कपिल शर्माने जेव्हा टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील आपला संघर्ष चालू केला होता तेव्हा त्याला कुणीही गॉडफादर नव्हता. शून्यापासून आपला प्रवास सुरू करत कपिल शिखरापर्यंत पोहोचला आणि विनोदाचा बादशहा झाला.

Kapil Sharma
कॉमेडियन कपिल शर्माचा आज आहे वाढदिवस, इतक्या संपत्तीचा मालक आहे कपिल शर्मा 

थोडं पण कामाचं

  • कपिल ठरला होता 2007मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्ज’चा विजेता
  • यानंतर सुरू केला स्वतःचा कॉमेडी कार्यक्रम 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'
  • आज कपिल शर्मा आपल्या कुटुंबासह जगत आहे श्रीमंती आयुष्य

Kapil Sharma Birthday: कॉमेडी किंग (Comedy King) कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या विनोदाच्या टायमिंगसाठी (timing) ओळखला जातो. सामान्य माणसांपासून ते प्रत्येकजण कपिलच्या या कौशल्याचे चाहते (fans) आहेत. त्याने आपल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ (Comedy Nights with Kapil) आणि ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमांमधून सर्वांच्याच मनात खास जागा निर्माण केली आहे.

मूळचा अमृतसरचा आहे कपिल शर्मा

कपिल शर्मा हा मूळचा अमृतसरचा रहिवासी आहे. एका छोट्या घरात राहणारा कपिल आज एक असे आयुष्य जगतो आहे जे लाखो लोकांचे स्वप्न आहे. कपिलकडे आज अनेक महागड्या गाड्या आहेत आणि कोट्यावधी रुपयांच्या बंगल्यांचा तो मालक आहे.

कपिलला आहे महागड्या गाड्यांची आवड

कपिलने 2013 साली एक लाल रेंज रोव्हर इव्होक एसडी 4 गाडी खरेदी केली होती. या कारची किंमत 50 ते 65 लाख आहे. पण आता ही कार बंद झाली आहे. याशिवाय त्याच्याकडे एक मर्सिडीज बेंज S350 CDI कारही आहे ज्याची किंमत 1.19 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे व्हॉल्व्हो XC कारही आहे ज्याची किंमत साधारण 90 लाख ते 1.3 कोटी आहे.

ही आहेत कपिलची महागडी घरे

पंजाबमध्ये कपिल शर्माने पंजाबमध्ये एक लग्झरी फार्महाऊस खरेदी केले आहे. याच्या चारी बाजूंना हिरवळ आणि आत एक जलतरण तलावही आहे. याची किंमत 25 कोटी आहे. याशिवाय कपिल शर्माने मायानगरी मुंबईत एक अपार्टमेंटही घेतले आहे ज्याची किंमत 15 कोटी आहे.

कपिलची आहे स्वतःटी व्हॅनिटी व्हॅन

कपिल शर्माकडे आपली स्वतःची व्हॅनिटी व्हॅनही आहे. याची किंमत 5.5 कोटी रुपये आहे. कपिलची व्हॅनिटी व्हॅन बॉलिवुडमधील सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅन्सपैकी एक आहे. यात सर्व सुखसुविधा आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी