KBC Completes 1000 Episode: केबीसीचे 1000 भाग पूर्ण, अमिताभ बच्चन भावूक, म्हणतात- खेल अभी बाकी है

Kaun Banega Crorepati: अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती लवकरच 1000 वा भाग पूर्ण करणार आहे. यावेळी अमिताभ त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेलीसोबत दिसणार आहेत.

Complete 1000 episodes of KBC
केबीसीचे 1000 भाग पूर्ण, शोमध्ये येणार खास पाहुणे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केबीसीचे 1000 भाग पूर्ण, अमिताभ बच्चन भावूक
  • मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेलीसोबत रंगणार एपिसोड
  • केबीसीच्या अनेक आठवणींना उजाळा

Kaun Banega Crorepati | मुंबई : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या शोचा प्रत्येक सीझन लोकांना आवडतो. या शोमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांबद्दल लोक खूप उत्सुक आहेत आणि स्वतः त्याच्याशी इतके जोडले आहेत की ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. सध्या  केबीसीचा १३वा सीझन (KBC Season 13) सुरू आहे. यादरम्यान शोचे 1000 एपिसोड्सही पूर्ण होणार आहेत. याच्या हजारव्या एपिसोडमध्ये अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि नात नव्या नवेली (Naweli) खास पाहुण्या म्हणून येत आहेत. यादरम्यान श्वेताने त्यांना केबीसीच्या प्रवासाबाबत प्रश्न केला, त्यानंतर अमिताभही भावूक झाले.


अमिताभ बच्चन भावूक झाले

या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये श्वेता तिच्या वडिलांना विचारते की हा तुमचा हजारवा एपिसोड आहे, तुम्हाला कसे वाटते, यावर अमिताभ म्हणतात की असे वाटते की जणू संपूर्ण जगच बदलले आहे. यानंतर, शोच्या पहिल्या एपिसोडपासूनचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. ज्यात शोमध्ये एक कोटी, पाच कोटी आणि सात कोटी रुपये जिंकणारे स्पर्धक दाखवले आहेत. केबीसीचा आतापर्यंतचा सगळा प्रवास एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये उतरवला आहे. यानंतर पुन्हा एकदा अमिताभची एन्ट्री होणार आहे. हे पाहून बिग बी खूप भावूक झालेले दिसतायेत आणि म्हणतात,  "चलिए खेल को आगे बढ़ाते हैं क्योंकि खेल अभी खत्म नहीं हुआ है."

यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर श्वेता आणि नव्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव केला होता. हा फोटो शेअर करताना बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिले की, सर्वात लाडक्या मुली. अमिताभ यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला होता. आता बच्चन कुटुंबातील तीन पिढ्यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत. 

कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोचे अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात खास स्थान आहे. कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोची फार मोठी मदत झाली होती. 

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी एका पान मसाला ब्रॅंडची जाहिरात करण्यासंदर्भात माघार घेतली होती. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बच्चनसाहेब सोशल मीडियावर ट्रोल होत होते. एका पान मसाला ब्रॅंडची जाहिरात (endrosement of pan masal brand)करण्यावरून लोकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. ते अशा वस्तूंच्या जाहिराती का करतात, आता पैशांची कमतरता आहे का असे प्रश्न लोकांनी विचारले होते. त्यावर बच्चन साहेबांनी दिलेल्या उत्तराने वातावरण अधिक पेटले होते. मात्र आता अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ब्रॅंडची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या कंपनीबरोबरचा करार संपवला आहे. तंबाखूसारख्या पदार्थांविरोधात काम करणाऱ्या संघटनांच्या अपीलनंतर अमिताभ बच्चन यांनी हे पाऊल उचलले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी