क्राईम पेट्रोलच्या ‘या’ अभिनेत्याचं निधन, घरात कमावणारे होते एकमेव

मालिका-ए-रोज
Updated May 11, 2020 | 18:13 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Crime Patrol Shaniqua Ansari Died: टीव्ही अभिनेता शफीक अन्सारी यांच्या घरी ते एकमेव कमावते होते. मात्र खूप काळापासून ते रिकामे होते. जाणून घ्या काय घडलं त्यांच्यासोबत...

Crime petrol
क्राईम पेट्रोलच्या ‘या’ अभिनेत्याचं निधन,आर्थिक मदतीचं आवाहन  |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • क्राईम पेट्रोलमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्याचं निधन
  • अभिनेते शफीक अन्सारी यांचं कॅन्सरवरील दीर्घ उपचारांनंतर निधन
  • घरात कमावणारे होते एकमेव व्यक्ती, काम न करत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची

मुंबई: बॉलिवूड अभिनेते इरफान खान, ऋषी कपूर यांच्यानंतर आता टीव्ही जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बातमी अशी आहे की, टीव्ही अभिनेता आणि खूप काळापासून प्रसिद्ध टीव्ही शो क्राईम पेट्रोलमध्ये काम करणारे अभिनेते शफीक अन्सारी यांचं निधन झालंय. १० मे रोजी शफीक अन्सारी यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार शफीक अन्सारी यांना पोटाचा कँसर झाला होता. अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल त्यांची झुंज अपयशी ठरली. 

शफीक अन्सारी यांच्याबद्दल आणखी महत्त्वाची माहिती समोर आलीय. शफीक यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. त्यांच्या घरात ते एकमेव कमावते व्यक्ती होते. मात्र कॅन्सरमुळे खूप काळापासून शफीक काम करू शकत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार ते पूर्णपणे जॉबलेस होते. तसंच कँसरवरील उपचारांवर त्यांच्याजवळील सर्वच पैसे खर्च झाले होते. सेव्हिंगद्वारे त्यांच्या औषधांचा खर्च केला जात होता.

टीव्ही अभिनेता शफीक अन्सारी आपल्या मागे पत्नी आणि तीन मुलींना सोडून गेले आहेत. आता शफीकच्या मित्रांनी त्यांचं फेसबुक पेज तयार केलं आहे, जिथं ते जनतेला आर्थिक मदत करण्याची अपील करत आहेत.

शफीक अन्सारी यांनी क्राईम पेट्रोल शिवाय अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. ते अभिनेत्यासोबतच एक लेखक सुद्धा होते. शफीक सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे पण सदस्य होते आणि १२ वर्षांपासून या असोसिएशन सोबत जोडलेले होते. सिंटामध्ये पण शफीक अन्सारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी