मुंबई: टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीसाठी(tv actor debina banerjee) सध्या आनंदाचा क्षण आहे. कारण ही अभिनेत्री पुन्हा आई बनणार आहे. हा हे खरं आहे. नुकताच या अभिनेत्रीने आपल्या मुलीला जन्म दिला होता. आता या अभिनेत्रीने पुन्हा प्रेग्नंसीची(announce pregnancy) घोषणा करत साऱ्यांना हैराण केले आहे. देबिना बॅनर्जीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची घोषणा केली. त्यानंतर तिचे चाहते मात्र हैराण झालेत. खरंतर हे फॅमिली प्लानिंगनुसार नाही कारण त्यांचे कुटुंब पूर्ण होत आहे. Debina banerjee announce pregnancy after 4 months of baby birth
अधिक वाचा - चेहऱ्याला कधीच लावू नका या 6 गोष्टी
देबिना बॅनर्जीने १६ ऑगस्ट २०२२ला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. फोटोत देबिना, तिचा पती गुरमीत चौधरी आणि मुलगी लियाना चौधरी दिसत आहे. गुरमीतने पत्नीची गळाभेट घेतली असून मुलीला घेतले आहे. या दरम्यान अभिनेत्रीने आपला सोनोग्राफी रिपोर्ट फ्लांट केला आहे. तिघेही व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहेत.
ही पोस्ट शेअर करत देबिना बॅनर्जीने खुलासा केला की ती पुन्हा आई बनत आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की काही निर्णय वर होत असतात आणि ते कोणीही बदलू शकत नाहीत. हा एक आशीर्वाद आहे. आम्हाला पूर्ण करण्यासाठी लवकरच येत आहे. यानंतर देबिनाने हॅशटॅग बेबी नंबर २, पुन्हा मम्मी, प्रेग्नंसी डायरीज, डॅडी अगेन असे हॅशटॅग वापरलेत.
अधिक वाचा - राष्ट्रध्वज डिस्पोज करण्याचे हे आहेत नियम
देबिना बॅनर्जी अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर सरोगसीच्या माध्यमातून आई बनली होती आणि ३ एप्रिल २०२२ला तिने मुलगी लियानाला जन्म दिला होता. टीव्ही अभिनेत्रीने अनेकदा आपल्या प्रेग्नंसीचा प्रवास जगासमोरसांगितला आहे. तिला प्रेग्नंट होण्यासाठी किती साऱ्या प्रक्रियेतून जाववे लागले. अखेर, देबिना आणि गुरमीत पुन्हा आई-बाबा बनत आहेत. त्यासाठी ते खूप उत्साही आहेत.