Delhi Crime Season 2: 'दिल्ली क्राइम'च्या सीझन 2 ची प्रतीक्षा संपणार आहे,कधी आणि कुठे रिलीज होणार हे जाणून घ्या

मालिका-ए-रोज
Updated Jul 23, 2022 | 23:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Delhi Crime Season 2 release date: नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सिरीज दिल्ली क्राइमचा दुसरा सीझन लवकरच येत आहे. 2019 मध्ये आलेल्या या मालिकेच्या पहिल्या सीझनची कथा दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित होती. त्याचबरोबर दुसऱ्या सीझनची कथा सीरियल किलरवर आधारित आहे.

Delhi Crime Season 2 to be release very soon
'दिल्ली क्राइम' सीझन 2 लवकरच येणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्ली क्राइम या लोकप्रिय वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे.
  • पहिल्या सीझनची कथा दिल्लीच्या निर्भया गँगरेप प्रकरणावर आधारित होती.
  • दुसऱ्या सीझनची कथा सीरियल किलरवर आधारित आहे.

Delhi Crime Season 2 release date: प्रसिद्ध आणि लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix ने काही दिवसांपूर्वीच यावर्षी येणार्‍या त्यांच्या फ्लॅगशिप सीरिजच्या नवीन सीझनची घोषणा केली होती आता त्यापैकी 'दिल्ली क्राइम'च्या नवीन सीझनची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली क्राइमचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता आणि दुसऱ्या सीझनची चाहत्यांकडून जोरदार मागणी होती. चाहत्यांची मागणी लक्षात घेऊन निर्मात्यांनी नवा सीझन आणण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Crime Season 2 to be release very soon)


नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सिरीज दिल्ली क्राइमचा दुसरा सीझन लवकरच येत आहे. 2019 मध्ये आलेल्या या वेबसीरीजच्या पहिल्या सीझनची कथा संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकरणावर आधारित होती. तर आता येणाऱ्या दुसऱ्या सीझनची कथा सीरियल किलरवर आधारित आहे. दिल्ली क्राइमच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. दुसऱ्या सीझनमध्येही शेफाली शाह डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत दिसणार आहे. वर्तिका चतुर्वेदी त्यांच्या टीमसह सीरियल किलरचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा : 'पुरंदरेंच्या लिखाणातून शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय'


शेफाली शाह, रसिका दुगल, राजेश तैलंग, अभिनेते आदिल हुसैन, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज आणि गोपाल दत्त यांच्याही या वेबसीरिजमध्ये पुन्हा भूमिका साकारल्या आहेत. यातील काही स्टार्सची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. या वेबसीरिजच्या टीझरला २४ तासांपेक्षा कमी कालावधीत ४ लाख ६६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अधिक वाचा : या चार राशीच्या लोकांनाचेच उत्पन्न वाढेल


या वेबसीरिजला 47 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिची मेहता निर्मित 'दिल्ली क्राईम 2' चे दिग्दर्शन तनुज चोप्रा यांनी केले आहे. हा क्राइम ड्रामा 26 ऑगस्ट 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर येईल. तेव्हा येणारा नवीन सीझन पूर्वीपेक्षा अधिक रोमांचक असणार आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी