‘Devmanus 2’ : एका तासाच्या विशेष भागामध्ये डॉ. अजितकुमार काय करणार कारनामा

प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आज पासून सुरू होत आहे.  ‘देवमाणूस 2’ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपुर्वी झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात आला होता.

Devmanus 2 Start From Today
आज डॉ.अजितकुमार ऊर्फ देवमाणूस कोणाचा करणार घात  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • आज रविवार 19 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता देवमाणूस 2 चा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.
  • काही दिवसांपूर्वी झी मराठीने याबाबतचा एक प्रोमो शेअर केला होता.

DevManus 2.0 Return : मुंबई : प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आज पासून सुरू होत आहे.  ‘देवमाणूस 2’ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपुर्वी झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात आला होता. डॉ. अजितकुमार देव ही पाटी हटवण्यात आल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले होतं. आज रविवार 19 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता देवमाणूस 2 चा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे. त्यासोबतच बाबू, सरु आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा ही पात्रं लवकरच पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झाले आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर अनेकजण फार आतुरतेने दुसऱ्या भाग कधी येणार याची वाट पाहात होते.  मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये  आजपासून डॉ. अजित कुमार काय कारनामा करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागू राहिली आहे. याचबरोबर डॉ. अजितकुमार किती बायकांना आपल्या जाळ्यात फसवणार, किती लोकांचा हत्या करणार याविषयीही चिंता व्यक्त करत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी झी मराठीने याबाबतचा एक प्रोमो शेअर केला होता.

या प्रोमोत ‘देवमाणूस’मधील डॉ. अजित कुमारचे पुतळा पाहायला मिळत आहे. यानंतर काही सेकेंदात देवमाणूस महाआरंभ एक तासाचा विशेष भाग असे लिहिलेले दिसत आहे. या व्हिडिओला झी मराठीने हटके कॅप्शन दिले होते. “जिथे तिथे देवमाणसाचा पुतळा, नक्की भानगड काय ?नवी मालिका ‘देवमाणूस 2’ महारंभ होतोय एक तासाच्या विशेष भागाने 19 डिसेंबरला, रविवारी रात्री. 9 वा आणि 20 डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री. 10.30 वा,” अशा आशयाचे खास कॅप्शन देण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी