Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता'मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिशा वाकानी पुन्हा कधीच येणार नाही! 5 वर्षांनंतर असे आहे आयुष्य आणि ही आहे नेट वर्थ.

मालिका-ए-रोज
Updated May 24, 2022 | 17:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dayaben Fame Disha Vakani Personal Life and Net Worth: दयाबेन 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पुन्हा येत आहे. दयाबेन परत येत आहे. मात्र, दिशा वाकानी दयाबेन म्हणून शोमध्ये परतणार नसल्याचं म्हटलं जात आहे. पण त्याआधी जाणून घ्या तिने शो का सोडला आणि आता ती काय करतेय?

Disha Wakani will never return in the role of Dayaben in 'Tarak Mehta'!
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दयाबेन परतणार?  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दयाबेन परतणार?
  • दिशा वाकानी मात्र, दयाबेनच्या भूमिकेत पुन्हा दिसणार नाही
  • कोण असणार तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील नवीन दयाबेन याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.

Dayaben Fame Disha Vakani Personal Life and Net Worth: सोनी सब टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  सर्वांनाच आवडतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच जण मोठ्या उत्साहाने हा शो बघतात. 2008 मध्ये हा शो सुरू होऊन 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. 
मात्र निर्मात्यांनी मनोरंजनात कोणतीही कसर सोडली नाही. आजही या शोची टप्पू सेना आणि जेठालाल-बापूजींच्या खोड्यांची मजा प्रेक्षक घेत आहेत.

या शोला निरोप देऊन अनेकांनी प्रेक्षकांची निराशा केली आहे. काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा (Sailesh Lodha)तारक मेहता बनल्याची बातमी आली होती. त्यानंतर बबिता जी फेम मुनमुन दत्तानेही (Munmun Dutta) शो सोडल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व दुःखद बातम्यांदरम्यान एक आनंदाची बातमीही ऐकायला मिळाली. दयाबेन या शोमध्ये पुन्हा येणार आहे. स्वतः निर्माता असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

मात्र, खरी मेख तर इथेच आहे. कारण, दिशा वाकानी या शोचा हिस्सा नसणार. दिशा वाकानी दयाबेन म्हणून मालिकेत परतणार नसल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. ती अनेकदा शोमध्ये परतणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण ती संधी कधीच आली नाही आणि यादरम्यान निर्मात्यांना तिच्यासारखी दुसरी कोणीही अभिनेत्रीसुद्धा सापडली नाही. पण आता दयाबेनची भूमिका जी कोणी करेल, ती दिशा वाकानीइतकाच चांगला अभिनय करेल, अशी आशा प्रेक्षकांना आहे.

मात्र, आता आम्ही तुम्हाला दिशा वाकानीबद्दल अशा काही गोष्टींची माहिती देणार आहोत ज्या एक चाहते म्हणून तु्म्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. 


दिशा वकाणीने ऐश्वर्या-हृतिकसोबत काम केले होते

दिशा वकानीने गुजराती थिएटरमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने 'कमल पटेल Vs धमाल पटेल' आणि 'लाली लीला' सारखे शो केले. याशिवाय 2002 मध्ये शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या 'देवदास' आणि 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'जोधा अकबर'मध्ये दिशाने सपोर्टिंग रोल केला होता. त्यानंतर यावर्षी दिशा वकानीला दयाबेन या मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली. दयाबेनची व्यक्तिरेखा घराघरात आवडू लागली. पण सप्टेंबर 2017 मध्ये दिशा वाकानीने या शोला अलविदा केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

दिशा वाकानीने 'तारक मेहता' ही मालिका का सोडली?

दिशा वकानीने तारक मेहता या मालिकेत 9 वर्ष काम केले.  पण ही 9 वर्षे कशी गेली हे प्रेक्षकांना कळलेच नाही. तिच्या शो सोडण्याच्या वृत्ताने सर्वजण नाराज झाले होते. कारण ती या शोचा महत्त्वाचा भाग होती. दिशा वाकानीने 24 नोव्हेंबर 2015 रोजी मुंबईस्थित चार्टर्ड अकाउंटंट मयूर पंड्यासोबत लग्न केले.30 नोव्हेंबर 2017 रोजी दिशाने एका मुलीला जन्म दिला. गरोदरपणात दयाबेनने प्रसूती रजा घेऊन तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडली. ती काही महिन्यांनी परतणार असल्याच्या बातम्या त्यावेळी येत होत्या. पण मुलीच्या आणि कुटुंबाच्या काळजीपोटी ती परत आलीच नाही. दिशाने मालिकेत पुन्हा यावे यासाठी निर्मात्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.


दिशा वाकानीच्या पतीची काय होती मागणी?

दिशा वाकानीची कमतरता मालिकेत पदोपदी जाणवत होती, कारण जेठालाल जेव्हा दिसायचे तेव्हा दयाबेनची आठवण यायची. पण दुर्दैवाने ती शोमध्ये दिसली नाही. चाहत्यांना तिच्याशिवाय पाच वर्षे काढावी लागली. मात्र, पती मयूरमुळे ती शोमध्ये परत येऊ शकली नसल्याची बातमीही आली. दिशा दिवसातून फक्त तीन तास शूट करेल, अशी तिच्या पतीची मागणी होती.सेटवर त्यांच्या मुलीसाठी पाळणाघर असावे. मुलीची नर्सही तिथेच राहणार. एवढेच नाही तर दिशाला एका एपिसोडसाठी सुमारे दीड लाख रुपये फी म्हणून द्यायला हवी. जे निर्मात्यांनी मान्य केले नाही. आणि शोचे डायरेक्टर त्याची रिप्लेसमेंट आणतील असे सांगण्यात आले. याक्षणी कशाचीही पुष्टी झालेली नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Disha Vakani (@disha.vakani)


दिशा वाकानी सध्या कुठे आहे?

दिशाने 2018-2019 मध्ये शोसाठी एक कॅमिओ देखील शूट केला होता. आणि काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये तिला ओळखणे कठीण होते. तिने आपल्या मुलीला कडेवर घेतलेले या फोटोत दिसत आहे.  ती मूळची अहमदाबाद, गुजरातची आहे. तिथे तिचे मामा आहेत, तिथे ती येत-जात असते.


दिशा वाकानीची नेट वर्थ किती आहे?

दिशा वाकानीची एकूण संपत्ती 37 कोटी आहे. जोपर्यंत ती या शोमध्ये लाखो रुपये फी घेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे बीएमडब्ल्यू कार आहे. शो आणि चित्रपटांव्यतिरिक्त तिने जाहिराती करूनही कमाई केली आहे. दिशा वाकानीने ड्रामाटिक आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी