TMKOC: ‘डॉ हाथी’चा मुलगा ‘गोली’ला झाली कोरोनाची लागण, अजूनही होणार का कार्यक्रमाचे चित्रीकरण?

तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमातील गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहला कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत या लोकप्रिय कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू राहणार की बंद होणार याबद्दल साशंकता आहे.

Kush Shah
‘डॉ हाथी’चा मुलगा ‘गोली’ला झाली कोरोनाची लागण, अजूनही होणार का कार्यक्रमाचे चित्रीकरण? 

थोडं पण कामाचं

  • चित्रीकरणादरम्यान पूर्ण सावधानी घेत असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे
  • ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह, ते गृहविलगीकरणात
  • तेलगू आणि मराठी भाषेतही येणार हा कार्यक्रम

मुंबई : टीव्हीवरील (TV) प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम (famous comedy show) तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma) यामधील कलाकारांना (actors) एकापाठोपाठ एक कोरोनाची लागण (corona infection) होत आहे. कार्यक्रमातील डॉक्टर हाथीचा (Dr. Hathi) मुलगा (son) गोलीची (Goly) भूमिका साकारणाऱ्या कुश शाह (Kush Shah) या अभिनेत्याची कोरोना चाचणी (corona test) आता पॉझिटिव्ह (positive) आली आहे. नव्या दिशानिर्देशांनुसार (guidelines) सर्व कार्यक्रमांमधील कलाकार आणि टीमच्या सदस्यांना (team members) चित्रीकरणाआधी (shooting) आपली कोरोना चाचणी करायची आहे आणि एप्रिल 9 रोजी यातील 110 सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी (RTCPR test) झाली. यादरम्यान कुश आणि इतर तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

चित्रीकरणादरम्यान पूर्ण सावधानी घेत असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे

नुकताच सास, बहू और बेटियांला दिलेल्या मुलाखतीत कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी यांना जेव्हा याबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, ‘आम्ही चित्रीकरणादरम्यान पूर्ण सावधगिरी बाळगत आहोत. जर कुणीही थोडे आजारी असल्याचे दिसले तर त्याला तिथे न येण्यास सांगितले जात आहे. कुश शाह गोलीची भूमिका करतात आणि निर्मितीच्या टीममधील काही लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रमुख कलाकारांपैकी कोणीही कोव्हिड पॉझिटिव्ह आढळलेले नाही.’

ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह, ते गृहविलगीकरणात

असित यांनी असेही सांगितले की ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ते सर्व सध्या गृहविलगीकरणात आहेत. त्यांनी सांगितले की येत्या 15 दिवसांत कोणतेही चित्रीकरण होणार नाही. जनता कर्फ्यूनंतर काही दिवस चित्रीकरण होणार नाही. अनेक कार्यक्रमांच्या निर्मात्यांनी चित्रपटांचे चित्रीकरण मुंबईऐवजी गोव्यात करण्याची आखणी केली आहे पण असित यांनी असे करण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की टीममधील सर्वांचे आरोग्य धोक्यात घातला येणार नाही. काही काळ थांबून ते पुढील योजना आखतील.

तेलगू आणि मराठी भाषेतही येणार हा कार्यक्रम

आता हा कार्यक्रम तेलगू आणि मराठी भाषेतरी प्रदर्शित होणार आहे. स्थानिक दर्शकांना आपल्या कार्यक्रमाकडे आकर्षित करणे या उद्देशाने निर्मात्यांनी हे पाऊल उचलले आहे. इतकेच नाही, तर इतर स्थानिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आणण्याची निर्मात्यांची योजना आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी