Rakhi sawant: ड्रामा क्विन राखी सावंत बिग बॉस 15मध्ये येणार, अब आयेगा मजा

Rakhi sawant:आतापर्यंत बिग बॉसच्या प्रत्येक सिझन हिट झालाय. मग ते हिंदी असो वा मराठी असो. मात्र, बिग ब़ॉसचा 15वा सिझन प्रेक्षकांचं मन जिंकण्यात कमी पडताना दिसतोय. आणि म्हणूनच की काय आता बिग बॉसच्या घरात राखी सावंत आणि तिचा नवरा एन्ट्री घेणार असल्याचं समजतंय.

Drama Queen Rakhi Sawant will be appearing in Bigg Boss 15
छप्पर फाड टीआरपी , राखी सावंतची बिग बॉसमध्ये एन्ट्री  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसच्या घरात आता रंगणार खरा ड्रामा
  • राखी आणि तिचा नवरा घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री
  • राखीची एन्ट्री टीआरपीची गणितं बदलणार?

Rakhi sawant: मुंबई: स्मॉल स्क्रीनवरील प्रचंड लोकप्रिय असा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. प्रेक्षकांमध्ये सतत या रिएलिटी शोची (Reality show)चर्चा असते. मात्र, बिग बॉसचा (Big Boss) 15वा सिझन म्हणावी तशी लोकप्रियता मिळवू शकलेला नाही. टीआरपीच्या (TRP) गणिणूतात बिग बॉसचा हा सिझन मागे पडलाय. आणि म्हणूनच की काय आता बिग बॉसच्या या घरात राखी सावंतची (Rakhi Sawant) वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचा नवराही एन्ट्री घेणार असल्याचं समजतंय. राखी आपला नवरा रितेशसोबत बिग बॉसमध्ये येणार आहे. जिथे राखी सावंत तिथे टीआरपी हे जणू एक गणितच झालंय त्यामुळेचं निर्मात्यांनी राखीला बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे आणण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या स्म़ॉल स्क्रीनवर रंगतेय. (Drama Queen Rakhi Sawant will be appearing in Bigg Boss 15, now it will be fun)

बिग ब़ॉसच्या पहिल्या सिझनमध्येही राखी सावंतने एन्ट्री घेतली होती. त्यानंतर गेल्या सिझनमध्ये म्हणजेच अर्थातच 14 व्या सिझनमध्येही राखी सावंतने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. मात्र ऐनवेळी तिने १४ लाख रुपये स्वीकारत अंतिम फेरीतून माघार घेतली. आईच्या उपचाराकरिता पैशांची गरज असल्याचं तिने सांगितलं होतं. यावेळी बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच जाणार असल्याचा निर्धार तिने केला असल्याचं ती म्हणाली."मी ट्रॉफीवर लटकेन पण ती घरी नक्की आणेन. साम, दाम, दंड, भेद सगळं करेन आणि यावेळी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन", असं ती पुढे म्हणाली.


बिचुकले बाहेर

मराठी बिग बॉस सिझन 2 चे स्पर्धक असलेले अभिजीत बिचकुले बिग ब़ॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याची बातमी होती. मात्र, अभिजीत यांना कोरोना झाल्याची बातमीही आता समोर आलीय. तर देवोलिना भट्टाचार्य आणि रश्मी देसाईसुद्धा बिग बॉसच्या 15व्या सिझनमध्ये एन्ट्री घेणार आहेत.

तर तिकडे बॉलीवूडचे आणि देशाचे लक्ष लागलेले लग्न अधिकाधिक चर्चेत येते आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी आपले नाते लोकांपासून लपवून ठेवले आहे. आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असले तरी दोघंही याबाबत उघडपणे बोललेले नाही. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असली असल्याचं समजतंय. शाही लग्नासाठी ते लवकरच राजस्थानच्या जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र, आधीच्या वृत्तानुसार, दोघेही पुढच्या आठवड्यात कोर्ट मॅरेज करणार आहेत त्यानंतर लवकरच ते आपल्या लग्नासाठी राजस्थानला पोहोचणार आहेत. कतरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाहापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेजनंतर लवकरच तो जयपूरमध्ये पूर्ण विधींनी दोनदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आलीय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी