इडी तपासणार 'टीआरपी'

ED starts investigation into alleged TRP scam टीआरपी प्रकरणात आर्थिक व्यवहारांची शहानिशा इडी करणार

ED starts investigation into alleged TRP scam
इडी तपासणार 'टीआरपी' 

थोडं पण कामाचं

  • इडी तपासणार 'टीआरपी'
  • टीआरपी प्रकरणात आर्थिक व्यवहारांची शहानिशा इडी करणार
  • टीआरपीची विश्वासार्हता टिकून राहावी यासाठी लवकरच ठोस पावले उचलणार - बार्क

मुंबईः मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police Commissioner) पत्रकार परिषद घेऊन टीव्ही चॅनलच्या टीआरपी (Television Rating Point - TRP) घोटाळ्याची माहिती जाहीर केली होती. या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाचा (Enforcement Directorate - ED) समावेश झाला. टीआरपी प्रकरणाची शहानिशा आता इडीचे पथक करेल. (ED starts investigation into alleged TRP scam)

ऑक्टोबर (October 2020) महिन्यात मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन निवडक टीव्ही चॅनल टीआरपी घोटाळ्यात गुंतल्याचे सांगितले होते. बार्क (Broadcast Audience Research Council - BARC) नावाची संस्था देशातील निवडक टीव्हीमध्ये एक यंत्र बसवते. या यंत्राने घेतलेल्या नोंदींच्याआधारे प्रत्येक चॅनलचा टीआरपी निश्चित होतो. या टीआरपीच्या आधारे टीव्ही चॅनल स्वतःकडे दिसणाऱ्या जाहिरातींसाठीचे दरपत्रक ठरवतात आणि जाहिराती दाखवून उत्पन्न मिळवतात. पण काही चॅनल ज्या टीव्हींमध्ये टीआरपी मोजणारे यंत्र आहे ते टीव्ही नेमके कोणत्या घरात आहेत त्याची माहिती घेऊन संबंधित कुटुंबांना स्वतःचा चॅनल सतत बघण्यासाठी लाच देत असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले होते. या प्रकरणात या प्रकरणात एकपेक्षा जास्त राज्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याच कारणामुळे संपूर्ण प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची शहानिशा इडी करणार आहे.

इडीने टीआरपी प्रकरणात आर्थिक अफरातफर प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Money Laundering Act - PMLA) एफआयआर (First Information Report - FIR) नोंदवून तपास प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी टीआरपी प्रकरणात विशिष्ट वृत्तवाहिनीचे नाव घेऊन तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस दबाव आणत आहेत असा आरोप हंसा रिसर्चने (Hansa Research) केला. हंसा रिसर्च ही कंपनी बार्क या संस्थेसाठी टीआरपी प्रक्रियेशी संबंधित काम करते. हंसा रिसर्चने मुंबईत उच्च न्यायालयात (High Court, Mumbai or Bombay High Court or Mumbai High Court) स्वतःची बाजू मांडली. यानंतर उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितले. 

आता पर्यंत टीआरपी प्रकरणात १२ जणांना अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे. टीआरपी प्रकरणात आर्थिक व्यवहारांची शहानिशा इडी करणार आहे. तपासातून पुढे काय निष्पन्न होते याकडे टीव्ही विश्वाचे लक्ष लागले आहे. टीआरपी प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे बार्क या संस्थेने टीआरपी जाहीर करण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. टीआरपीची विश्वासार्हता टिकून राहावी यासाठी लवकरच ठोस पावले उचलणार असल्याचे संकेत बार्क या संस्थेने दिले.

इडी करत असलेल्या तपासामुळे आरोपांच्या सत्यतेची पडताळणी होणार

टीआरपी प्रकरणात आर्थिक व्यवहारांची शहानिशा इडी करणार आहे. या तपासातून टीआरपी प्रकरणातील आरोपांच्या सत्यतेची पडताळणी होईल, असे मत टीव्ही विश्वातून (TV World) व्यक्त होत आहे. टीआरपीची विश्वासार्हता टिकून राहाण्यासाठी तपास पूर्ण होणे आवश्यक आहे, असेही टीव्ही विश्वाचे मत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी