Deepika Chikhalia Fake Account: ‘सीते’च्या नावानं बनावट इंस्टा अकाऊंट बनवून मागितले पैसे

मालिका-ए-रोज
Updated May 21, 2020 | 21:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Deepika Chikhalia Fake Instagram Account: रामानंद सागर यांची प्रसिद्ध मालिका रामायणमधील सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नावानं इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट उघडल्याचं प्रकरण समोर आलंय. जाणून घ्या...

deepika chikhalia
‘सीते’च्या नावानं बनावट इंस्टा अकाऊंट बनवून मागितले पैसे 

थोडं पण कामाचं

  • रामायणातील सीतेच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट
  • अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून दिली माहिती
  • बनावट अकाऊंट विरोधात तक्रार करत फॅन्सना दिली चेतावनी

Deepika Chikhalia Fake Instagram Account: रामानंद सागर यांची प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया सध्या चर्चेत आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आलं. तेव्हा दूरदर्शनवर रामायणचं पुन:प्रसारण सुरू झालं. तेव्हा मीडियापासून तर सोशल मीडियापर्यंत दीपिका चिखलियांचं नाव सध्या चर्चेत आलंय. फॅन्स त्यांनी ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शोधू लागलेत.

या चर्चेनंतर दीपिका यांना नुकसान पण सहन करावं लागलंय. दीपिका यांच्या नावानं सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केले गेले आहेत. अनेक युजर्स फॉलोअर्स मिळविण्यासाठी अशा नामवंत व्यक्तींचे अकाऊंट बनवले जातात. मात्र दीपिका यांच्या प्रकरणात याहून अधिक घडलं आहे. दीपिका चिखलिया यांचं इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट सुरू करून त्याद्वारे घोटाळा केला गेलाय.

काही यूजर्सनं दीपिका चिखलिया यांच्या नावानं इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केलं. पहिले त्यात अपडेट आणि फोटो टाकले गेले आणि त्यानंतर अकाऊंटद्वारे दान मागितलं गेलं. याची माहिती दीपिका चिखलिया यांनी स्वत: आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे दिलीय. दीपिका यांनी ट्वीटरवर बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा स्क्रीनशॉट लावून आपल्या फॅन्सना त्याबाबत माहिती दिलीय. दीपिका यांनी स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की, हे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट आहे आणि यात दान मागितलं जातंय, कृपया कुणीही यात फसू नये.

अकाऊंटबाबत केली तक्रार

दीपिका चिखलिया इंस्टाग्रामवर पण खूप अॅक्टिव्ह असतात. इंस्टाग्रामवर Instagram.com/dipikachikhliatopiwala हे दीपिका यांचं व्हेरिफाईड ऑफिशिअल अकाऊंट आहे. इथं दीपिका आपले फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात. असं असलं तरी काही असामाजिक तत्त्व बनावट अकाऊंट बनवून लोकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहेत. दीपिका यांनी बनावट अकाऊंट विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दीपिका चिखलिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक जुन्या आठवणींचा खजिना फॅन्ससमोर आणला. रामायण मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो, आठवणी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या. तसंच राजकारणात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेव्हाचा जुन्या काळातील एक फोटो सुद्धा त्यांनी शेअर केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी