कपिल शर्माच्या अपार्टमेंटमध्ये दुर्घटना, आग लागली आणि नंतर

मालिका-ए-रोज
Updated Jul 19, 2019 | 22:06 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कपिल शर्माच्या मुंबईतील ओशिवारा परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये गुरूवारी अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की चौथ्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या...

Kapil Sharma
कपिल शर्माच्या अपार्टमेंटमध्ये दुर्घटना  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कपिल शर्माच्या ओशिवारा अपार्टमेंटमध्ये आग
  • आगीत कुणी जखमी न झाल्याची माहिती
  • कपिलचं घर अनेक दिवसांपासून होतं बंद, स्वयंपाकघराला लागली आग

मुंबई: कॉमेडियन कपिल शर्माच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आलीय. कपिल राहत असलेल्या ओशिवारा अपार्टमेंटमध्ये गुरूवारी अचानक आग लागली. आग खूप भीषण होती. चौथ्या मजल्यावर लागलेल्या या आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी ही दुर्घटना घडल्या त्यावेळी कपिल शर्माच्या घरात कुणीही नव्हतं. त्यामुळे आगीत कुणीही जखमी झालं नाही.

एका वेबसाईटनं दिलेल्या रिपोर्टनुसार स्वयंपाकघरात ही आग लागली होती. जसं आजुबाजूच्या लोकांना याबाबत कळलं त्यांनी लगेच अग्निशमन दलाला सूचना दिली. त्यानंतर अर्ध्या तासानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं. आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाहीय. कपिल शर्माच्या घरात घडलेल्या या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपिल खूप दिवसांपूर्वीच आपल्या दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे. त्यांचं हे घर खूप दिवसांपासून रिकामं पडलं होतं.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Flight delayed #mumbai #delhi

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर कपिल शर्मा त्याचा प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या सिझनसोबत टेलिव्हिजनवर परतला आहे. त्याचा शो खूप चांगला सुरू आहे. यात कपिल नवनवीन कॅरेक्टर्स सहभागी करतोय. नुकताच कपिल शर्मानं प्रेक्षकांना आपल्या नवीन कॅरेक्टर उस्ताद मीडियम बेगम अली खानची ओळख करून दिलीय. या भूमिकेमध्ये स्वत: कपिल दिसतोय. नवीन कॅरेक्टरसाठी कपिलनं कव्वाल सारखा गेटअप घेतलाय. कपिल शर्मा आपल्या शोमध्ये कप्पू शर्मा, राजेश अरोडा, चप्पू शर्मा सोबतच आता हे चौथं कॅरेक्टर प्ले करतोय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Short trip.. but was more than worth.. love u mummy

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#punjab #amritsar #jalandhar #kulche #mathicholle #Lassi = 5 kg weight gain

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

कपिल शर्मा सध्या फॅमिली प्लानिंगच्या बाबतीतही चर्चेत आहे. कपिलच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ प्रेग्नेंट आहे. त्यामुळे असं सांगितलं जातंय की, कपिल आणि गिन्नी हे जोडपं लवकरच बेबीमून वर जाण्याचं प्लानिंग करतंय. कारण आता गिन्नीचा चौथा-पाचवा महिना सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्मा आणि गिन्नी बेबीमूनसाठी कॅनडाला जाणार आहे. म्हणून लवकरच कपिल शर्मा आपल्या टीव्ही शो ‘द कपिल शर्मा शो सिझन २’मध्ये ब्रेक घेणार आहे.

कपिल शर्मा लग्नापूर्वी खूप डिप्रेशनमध्ये गेला होता, असं सांगितलं गेलं होतं. त्याच्या शोचा पहिला सीझन बंद झाला. त्याचे अनेक सोबती त्याला सोडून गेले होते. त्यामुळे कपिल जरा चिडलाच होता. पण आता त्यानं गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत लग्न केलं आणि त्याच्या शोचा दुसरा सिझनही सुरू झाला. आता तर कपिल बाबा होणार आहे. त्यामुळे आता या जोडप्याच्या आयुष्यात आणखी आनंद बहरेल अशीच आशा करूया.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कपिल शर्माच्या अपार्टमेंटमध्ये दुर्घटना, आग लागली आणि नंतर Description: कपिल शर्माच्या मुंबईतील ओशिवारा परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये गुरूवारी अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की चौथ्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...