Saregamapa little champs marathi : गौरी गोसावी ठरली मराठी सारेगमप लिटील चॅम्प्सची महाविेजेती

मालिका-ए-रोज
Updated Dec 06, 2021 | 11:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Saregamapa marathi little champs grand finale : मराठी सारेगमप लिटील चॅम्प्सचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. यावेळी गौरी गोसावी लिटील चॅम्प्सची महाविजेती ठरली.

Gauri Gosavi became the winner of Marathi Saregampa Little Champs
गौरी गोसावी झाली मराठी सारेगमप लिटील चॅम्पसची विनर 
थोडं पण कामाचं
  • मराठी सारेगमपचा महाअंतिम सोहळा
  • गौरी गोसावी ठरली सारेगमप लिटील चॅम्पसची महाविजेती
  • एकाहून एक सरस परफॉर्मन्सने जिंकली प्रेक्षकांची मनं

Saregamapa marathi little champs winner : मराठी सारेगमप लिटिल चॅम्पसचा महाअंतिम सोहळा रविवार अर्थातच 5 डिसेंबरला पार पडला.
यावेळी ओमकार कानिटकर, स्वरा जोशी, पलाक्षी दीक्षित, सारंग भालके आणि गौरी गोसावी हे पाच लिटील चॅम्प्स टॉप 5 मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत गौरी गोसावीने विजेती होण्याचा मान पटकावला.

यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला 1 लाखाची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या ओमकार कानिटकर आणि सारंग भालकेला प्रत्येकी 75 हजारांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली,

12 वर्षांपूर्वी आपल्या गायनाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी पंचरत्न अर्थातच मु्ग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांनी या लिटील चॅम्प्सच्या पर्वात परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली. या महाअंतिम सोहळ्याला गायक सुदेश भोसले, अन्नु कपूर, तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. 

महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती कांदिवली, मुंबईची गौरी गोसावी. मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने हे पर्व अजूनच मजेशीर बनलं आणि महाअंतिम सोहळा देखील अगदी दिमाखदार झाला.

वास्तुशास्त्राचा हा उपाय करताच अडकणार लग्नाच्या बेडीत Also Read : वास्तुशास्त्राचा हा उपाय करताच अडकणार लग्नाच्या बेडीत

विजेतेपद पटकवल्यावर आपला आनंद व्यक्त करताना गौरी म्हणाली, "मला खूप आनंद होतोय की मला लिटिल चॅम्प्सचा किताब मिळाला. आम्ही सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आणि या पर्वात छान छान गाणी सादर केली. मी सगळ्या ताई दादांचे आभार मानते कारण त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आणि मी विजेतेपद मिळवलं यात त्यांचं श्रेय आहे. माझ्या आई-वडिलांनीही खूप मेहनत घेतली म्हणूनच मी इथवर पोहोचू शकले असाही गौरीने आवर्जून उल्लेख केला."


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी