Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding: पाठक बाई आणि राणादाचं लवकरच शुभमंगल?, लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचा श्रीगणेशा

मालिका-ए-रोज
Updated Aug 15, 2022 | 11:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi celebrity couple wedding : अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi ) आणि अभिनेत्री अक्षय देवधर ( Akshaya Deodhar) यांचं लवकरच शुभमंगल होणार असल्याची चर्चा मराठी सिनेसृष्टीत रंगलीय. लवकरच राणादा आणि पाठक बाई विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप या दोघांकडून अशी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Hardeek Joshi and Akshaya Deodhar will get marry soon
'या' मराठी सेलिब्रिटी कपलची लगीनघाई  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राणादा आणि पाठक बाईंचं लवकरच शुभमंगल?
  • अक्षया देवधरने शेअर केली पहिल्या केळवणाची स्टोरी
  • हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरूवात

Marathi celebrity couple wedding : अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi ) आणि अभिनेत्री अक्षय देवधर ( Akshaya Deodhar) 
यांचं लवकरच शुभमंगल होणार असल्याची चर्चा मराठी सिनेसृष्टीत रंगलीय. लवकरच राणादा आणि पाठक बाई विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 
मात्र, अद्याप या दोघांकडून अशी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्मॉल स्क्रीनवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून राणादा आणि पाठकबाईंची जोडी एकदम हीट झाली होती. प्रेक्षकांनी राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. आता हे रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये लग्न करणार आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच पार पडला असून आता लवकरच त्यांचे शुभमंगल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ( Hardeek Joshi and Akshaya Deodhar will get marry soon )

अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नगाठ बांधणार असले तरी त्यांची वेडिंग डेट समोर आलेली नाही. दोघांपैकी कोणीही लग्नाची तारीख अजून सांगितलेली नाही. मात्र, लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली हे नक्की. अक्षयाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्पेशल फोटो शेअर करत पहिलं केळवण होत असल्याचं म्हटलं आहे. 

हार्दिक आणि अक्षया दोघही केळवणासाठी पारंपरिक पोशाखात दिसत होते. अक्षयाने निळ्या रंगाची साडी नेसली होती, तर हार्दिकने निळ्या रंगाचाच कुर्ता घातला होता. त्यांचं पहिलं केळवण दापोलीला कोकणात झाल्याचंही अक्षयाने इंस्टावर पोस्ट केलेलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अधिक वाचा : या 5 बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटांमध्ये भरला देशभक्तीचा रंग

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अक्षया आणि हार्दिक बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून जाणार असल्याची चर्चा खूप दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहे. हार्दिक आणि अक्षया सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या लग्नाबद्दलचे, त्यांच्या नात्याबद्दलचे अपडेट्स ते कायम आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. 

अधिक वाचा : जॉर्जियाचे बोल्ड फोटोशूट


हे कपल या वर्षात लग्न करणार असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता हार्दिक नेमका बिग बॉसमध्ये जाणार का हे लवकरच समजेल. सध्या हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबत क्युट पोस्ट शेअर करताना दिसत असतात. एवढंच नाही तर दोघेही एकत्र सिनेमात झळकणार असल्याचं कळतंय. चाहते मात्र, राणादा आणि पाठक बाईंच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी