Pankaja Munde: कॉलेजमध्ये तुम्हाला कधी कुणी प्रपोज केलंय का मॅडम?, पाहा पंकज मुंडेंनी काय दिलं उत्तर 

Pankaja Munde in Bus Bai Bus: झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या. या कार्यक्रमात त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

has anyone proposed you in college on this question Pankaja Munde gives answer watch  Bus Bai Bus zee marathi
Pankaja Munde: कॉलेजमध्ये तुम्हाला कधी कुणी प्रपोज केलंय का मॅडम?, पाहा पंकज मुंडेंनी काय दिलं उत्तर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' कार्यक्रमात पंकजा मुंडेंचा सहभाग
  • 'बस बाई बस' कार्यक्रमात पंकजाताईंनी दिली सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे

Pankaja Munde on college life: झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' कार्यक्रमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. याच कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या नुकत्याच सहभागी झाल्या. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? कॉलेज लाईफ कशी होती, कॉलेजमध्ये कधी तुम्हाला कुणी प्रपोज केलं आहे का? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. पाहूयात पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रश्नांना कशी उत्तरे दिली. (has anyone proposed to you in college on this question Pankaja Munde gives the answer watch  Bus Bai Bus zee marathi)

एक आमदार की किमत तुम क्या जानो...

दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू... पंकजा मुंडे यांनी अशा प्रकारे फिल्मीस्टाईल उत्तर दिलं आहे. याच माध्यमातून पंकजा ताईंमध्ये दडलेली अभिनेत्री समोर आली.

अधिक वाचा : Sanjay Rathod: "कितीवेळा अशी बदनामी करणार? असेच सुरू राहणार असेल तर..."

कॉलेजमध्ये प्रपोज केलंय का?

पंकजा मुंडे यांना कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला की, कॉलेजमध्ये तुम्हाला कधी कुणी प्रपोज केलंय का मॅडम? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मला तो अनुभव आलेला नाहीये.

दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? 

पंकजा मुंडे यांनी या प्रश्नावर उत्तर देत म्हटलं, होय... कोण आणि कधी हे सांगत बसले तर एक तास वेगळा एपिसोड घ्यावा लागेल.... अनेकांनी भाजपत प्रवेश केला आहे. माझ्या जिल्ह्यात अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. मला माझ्या बाबांनी एक नेहमी सांगितलं आहे की, बेरजेचं राजकारण करायचं... वजाबाकीचं नाही. त्यामुळे आपल्याकडे बेरीज होत असेल.... अन् राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्त्वाचं असतं.

मी माझ्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा, सुरेश धस यांच्या सारख्या नेत्यांना भाजपत घेतलं आहे. अशा अनेकांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. इम्पोर्ट-एक्सपोर्ट हे सुरुच असतं असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी