Amruta Fadnavis: प्लॅस्टिक सर्जरी केलीय का मॅडम? या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी स्पष्टचं दिलं उत्तर

Amruta Fadnavis reaction on plastic surgery: अमृता फडणवीस यांनी खरोखर प्लास्टिक सर्जरी केली आहे का? या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Have you done plastic surgery madam on this question Dycm Devendra Fadnavis wife amruta fadnavis gives answer
Amruta Fadnavis: प्लॅस्टिक सर्जरी केलीय का मॅडम? या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी स्पष्टचं दिलं उत्तर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्लास्टिक सर्जरी केलीय? 
  • झी मराठीवरील बस बाई बस कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी या प्रश्नाचं दिलं उत्तर
  • अमृता फडणवीस यांच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियात होतेय चर्चा

Amruta Fadnavis reaction on plastic surgery: राज्याचे उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस या आपल्या गायनामुळे आणि राजकीय परिस्थितीवर खोचक प्रतिक्रियेमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस या नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि त्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. झी मराठी या वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्याने सुरू झालेल्या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना प्लास्टिक सर्जरी केल्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टच उत्तर दिलं आहे. (Have you done plastic surgery madam on this question Dycm Devendra Fadnavis wife amruta fadnavis gives answer)

नेमकं काय घडलं कार्यक्रमात? 

झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमाचा एक टिझर चॅनलच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, प्लास्टिक सर्जरी तुम्ही केलीय का ओ? यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. बऱ्याच लोकांनी मला ट्रोल देखील केलं आहे.

प्लास्टिक सर्जरी ही हिंमतीची गोष्ट आहे. त्यात एक रिस्क आहे. काही बिघडलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि भविष्यात त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

अधिक वाचा : "देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायला जायचे" Eknath Shinde आणि Devendra Fadnavis भेटीबाबत अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

अमृता फडणवीस यांनी पुढे म्हटलं, तुम्हाला मी सांगते की लग्नाच्याआधी मी कधीही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हती. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप केला तितकाच मेकअप मी केला होता. त्यानंतर नाही. देवेंद्रजी असे आहेत की, स्त्रीचा चेहरा ते पाहत नाहीत तर मन पाहतात.

मी काय घाबरते का त्यांना? 

देवेंद्रजींना लपून तुम्ही खरेदी करता का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना कार्यक्रमात विचारण्यात आला. या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी म्हटलं, मी काय घाबरते का त्यांना?.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी