TV Serials : ‘भाबीजी’ सौम्याचा गरोदरपणानंतर वजन घटवण्याचा नवा फंडा

मालिका-ए-रोज
Updated Apr 21, 2019 | 14:50 IST | टाइम्स नाऊ हिंदी

TV Serials : 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेतील अनिता अर्थात सौम्या टंडन सध्या गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करत आहे. त्यासाठी तिनं जीममधल्या ट्रेडमीलला कंटाळून एक नवाच फंडा स्वीकारलाय आणि चाहत्यांनाही तो सल्ला दिलाय.

saumya tandon dance workout
भाबीजी सौम्या डान्स करून घटवतेय वजन   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेतील अनिताचं कॅरेक्टर करणारी 'गोरी मेम' अर्थात सौम्या टंडन गेल्या काही महिन्यांपासून पडद्यावर दिसलेली नाही. तिचे चाहते पुन्हा तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचसाठी सौम्या सध्या जोरदार तयारी करताना दिसत आहे. आपल्या फिटनेसविषयी खूपच संवेदनशील असलेली सौम्या सध्या गरोदरपणानंतर आपलं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे जिममधल्या पारंपरिक ट्रेडमीलला फाटा देऊन डान्सच्या माध्यमातून वजन कमी करण्याची शक्कल तिने लढवली आहे. आपल्या जीम इन्सट्रक्टरसोबत ती डान्स करताना दिसत आहे. ट्रेडमीलला कंटाळला असाल तर, तुम्हीदेखील अशा डान्स स्टेप्स शिकून घ्या, असा सल्लाही तिनं चाहत्यांना दिलाय.

 

 

गरोदरपणानंतर स्त्रीचं शरीर पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागतो. वाढलेलं वजन करण्यासाठी खूप घाम गाळावा लागतो. सेलिब्रिटींसाठी तर ते खूपच आवश्यक असतं. कारण, गरोदरपणामध्ये काम थांबलेलं असतं आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असते. त्यातच सौम्या टंडन सारखी फिटनेसविषयी जास्त सजग असलेली अभिनेत्री असेल तर मग तिच्या फिटनेस फंड्याची जास्तच चर्चा होते. सौम्यानं १४ जानेवारीला मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव असणाऱ्या सौम्यानं सोशल मी़डियातूनच चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतरचा तिचा फोटोही खूप चर्चेत आला होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ariel yoga, my first class.

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_) on

 

आता सौम्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. ती सातत्याने काही ना काही तरी शेअर करत असते. त्यात आता तिनं वजन कमी करण्यासाठी एक मजेदार आयडिया शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये गोरी मेम आपल्या जीम इन्सट्रक्टरसोबत डान्स करताना दिसत आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सौम्या म्हणते, हल्ली मी रोज सकाळी उठताना परमेश्वराचे आभार मानते. कारण, जीममध्ये आता मज्जा करायला मिळणार आहे. माझ्यासारख्या ड्रेटमीलला कंटाळलेल्यांनी त्यांच्या इन्सट्रक्टरला एक दोन स्टेप्स शिकायला सांगा. म्युझिक लावा आणि मूडमध्ये येऊन आपल्या शरिराला पुन्हा शेपमध्ये आणा. असे एक्सरसाइज डोस घेत जा.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Working and working hard . And still a long way ahead.

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_) on

 

करिअर, मैत्री आणि लग्न

मुळात 'भाबीजी'ला वर्कआउट करण्याचा छंद आहे. तिने डिलिव्हरीनंतर काही दिवसांतच पुन्हा व्यायाम सुरू केला. सौम्याने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरियल ‘ऐसा देश है मेरा’मधून केली होती. त्यानंतर सैम्याने अनेक म्युझिक शोमध्ये अँकरिंग केलं पण, ‘भाबीजी घर पर है’ या सिरियलने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. सौम्याने 'जब वी मेट' सिनेमामध्ये गीतच्या बहिणीची छोटी भूमिका केली होती. सौम्याने २०१६मध्ये सौरभ देवेंद्र सिंह याच्याशी लग्न केलं. कॉलेजपासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. सौरभ मुंबईत इनव्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत आहे. सौरभने आयआयएम अहमदाबादमधून मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे तर सौम्यादेखील फोर्स स्कूल ऑफ मॅनेजमेटमधून एमबीए ग्रॅज्युएट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
TV Serials : ‘भाबीजी’ सौम्याचा गरोदरपणानंतर वजन घटवण्याचा नवा फंडा Description: TV Serials : 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेतील अनिता अर्थात सौम्या टंडन सध्या गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करत आहे. त्यासाठी तिनं जीममधल्या ट्रेडमीलला कंटाळून एक नवाच फंडा स्वीकारलाय आणि चाहत्यांनाही तो सल्ला दिलाय.
Loading...
Loading...
Loading...