Tunisha Sharma Pregnancy: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतला. तुनिषाने 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली, त्यानंतर दिवंगत अभिनेत्रीचा सहकलाकार आणि बाॅयफ्रेंड शीझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक केली. यानंतर तुनिशा गरोदर असल्याच्या बातम्या आल्या आणि जेव्हा शीजानने लग्नाला नकार दिला तेव्हा अभिनेत्रीने मृत्यूला कवटाळले. (How did Tunisha Sharma die? The postmortem report came out)
तुनिशा प्रेग्नंट असल्याचं ऐकलं होतं, पण आता या बातम्या खोट्या असल्याचे समोर येत आहेत. पोलिस आणि जेजे रुग्णालयाकडून अधिकृतपणे नाही, परंतु सूत्रांच्या हवाल्याने, तुनिषा शर्मा गर्भवती नव्हती. शवविच्छेदन अहवालाबाबत सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, अभिनेत्रीच्या शरीरावर कोणत्याही खुणा नाहीत, तर तिचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला.
मुंबई पोलिसांचे एसीपी चंद्रकांत जाधव म्हणाले, “तुनिषा शर्मा टीव्ही शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायची. तुनिशा आणि शीझान खान यांचे प्रेमसंबंध होते. दोघांचे १५ दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते, त्यानंतर अभिनेत्रीने टीव्ही सेटवर आत्महत्या केली.
अधिक वाचा : Anil Kapoor Net worth : एकेकाळी ब्लॅक करणारा अनिल कपूर आता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
नुकतेच 'मॅडम सर' फेम प्रीती तनेजा हिने तुनिशाबाबत मोठा दावा केला होता. प्रीती म्हणाली होती की, तुनिषा आणि शीजान रिलेशनशिपमध्ये होते आणि दिवंगत अभिनेत्री गरोदर होती. अशा परिस्थितीत ती शीजानला वारंवार लग्नासाठी विचारत होती, मात्र तो नकार देत होता. गरोदरपणामुळे तुनिषाला शीजनशी लग्न करायचे होते, मात्र शीजन वारंवार लग्नास नकार देत होता. मात्र, आता मीडिया रिपोर्ट्समध्ये तुनिशा प्रेग्नंट नसल्याचा दावा केला जात आहे.
तुनिषा शर्माच्या आईने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, तिची मुलगी आणि शीजान खान यांचे एकमेकांवर प्रेम होते. आपल्या मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्याने खानला जबाबदार धरले. त्यानंतर पोलिसांनी शीझान एम खानविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.