Hruta Durgule on OTT: अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आता एका नव्या प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृता आता वेबसीरिजमधून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या वेबसीरिजचा फर्स्ट लूक (Webseries teaser) प्रेक्षकांसमोर आलाय. गुरुवारी या वेबसीरिजचा टीझर रिलीज होणार आहे. ( Hruta Durgule OTT debut first look of webseries eka kaleche mani )
सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळेने टेलिव्हिजन, रंगभूमी आणि सिनेमाच्या माध्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. टाईमपास 3 आणि अनन्या या दोन दमदार सिनेमांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या सिनेमातील हृताच्या भूमिकेचं आणि त्यासाठी तिने घेतलेल्या मेहनतीचं खूप कौतुक होत आहे. नुकतंच हृताचं लग्न झालेलं आहे. मालिका, नाटक, आणि सिनेमानंतर आता हृता ओटीटी पदार्पण करायला सज्ज झाली आहे. हृताच्या पहिल्या वहिल्या वेब सीरिजची नुकतीच घोषणा झाली आहे. या वेबसीरिजचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
अधिक वाचा : आज आहे नील आर्मस्ट्रॉंग यांची पुण्यतिथी, वाचा आजचे दिनविशेष
'एका काळेचे मणी' असं या वेबसीरिजचं नाव असून लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये एका चित्र विचित्र फॅमिलीची आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत हृता प्रेक्षकांसमोर येणार आहे.
'एका काळेचे मणी' या वेबसीरिजची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि जिओ स्टुडिओज यांनी केली आहे. अभिनेता समीर चौघुले, विशाखा सुभेदार, हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर आणि प्रशांत दामले यांची धम्माल या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. अभिनेत्री हृता 'मीरा काळे' ही भूमिका साकारणार आहेत. तर प्रशांत दामले यांच्या व्यक्तिरेखचं नाव श्रीनिवास काळे असं आहे. तर पौर्णिमा मनोहर या अनुराधा काळे, रिशी मनोहर हा विवास्वान काळे आणि ऋतुराज शिंदे हा अर्जुन ही भूमिका साकारणार आहे.
अधिक वाचा : आलिया भट्टवर बॉडी शेमिंगमुळे 'हा' अभिनेता ट्रोल
ही वेब सीरिज म्हणजे एका क्रेझी फॅमिलीची हटके स्टोरी असणार आहे. पण कधी कधी ही फॅमिली थोडी क्रेझी वाटत असली तरी यातील सगळेच फुल टू शहाणे आहेत. अशा अतरंगी कुटुंबाचा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजचा टीझर गुरुवारी रिलीज होणार आहे.