Indian Idol 13 Winner Rishi Singh : 'इंडियन आयडॉल 13'चं हे पर्व तब्बल 9 महिने चाललं. या 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर देशाला या टीव्ही सिंगिग रियालिटी शोच्या (reality show) 13 व्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. नुकताच 'इंडियन आयडॉलचा महाअंतिम सोहळा पार पडला. यात विजेत्याची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर अयोध्येच्या ऋषी सिंहने 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. (Indian Idol 13 Winner : Rishi Singh won Indian Idol 13' trophy; know the Amount won with luxury car)
अधिक वाचा : मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा
'इंडियन आयडॉल 13'चं हे पर्व खूपच खास होतं. नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांनी या पर्वाचं परिक्षण केलं होतं. तर आदित्य नारायणने हे पर्व होस्ट केलं होतं. विजेतेपदासाठी 6 स्पर्धेकांमध्ये चुरस होती. टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी सिंग,शिवम शाह,चिराग कोतवाल,बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. ट्रॉफीसाठी सर्व स्पर्धकांनी चुरशीची लढत दिली.परंतु ऋषी सिंहने या सर्वांना मागे टाकत विजेतीपद मिळवलं. तर देवोस्मिता राय ही पहिली उपविजेती ठरली आहे. इंडियन आयडल फिनालेच्या अखेरच्या टप्प्यात जनेतेने लाईव्ह व्होटिंगद्वारे विजेत्याची निवड केली.
अधिक वाचा : यंदा 3 आणि 4 एप्रिल असे दोन दिवस का आहे महावीर जयंती?
ऋषीवर सध्या देशभरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋषी सिंह हा या पर्वाच्या ऑडिशनपासूनच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. त्याच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
एका क्षणात ऋषीच्या भविष्याला कलाटणी मिळाली आहे. इंडियन आयडॉल 13च्या ट्रॉफीसह ऋषी सिंहला 25 लाख रुपये आणि मारुती सुझुकी एसयूव्ही ही कार बक्षीस म्हणून मिळाली आहे. तसेच त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्टॅक्टदेखील मिळाला आहे. ऋषी सिंह 'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अयोध्येचा लोकप्रिय गायक ऋषी सिंह आज देशभरातील संगीतप्रेमींचा लाडका बनला आहे.
अधिक वाचा : तुरुंगवासाच्या शिक्षेला आज राहुल यांच्याकडून आव्हान
ऋषी जिंकल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. तसेच ऋषीला इथपर्यंत पाठवण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला.विजेतेपद मिळाल्यानंतर ऋषी सिंह म्हणाला, 'माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. जेव्हा माझे नाव विजेते म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.' अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.