मुंबई : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थमध्ये आजच्या भागात दाजिबाची आई अखेरच्या घटका मोजत असते. दाजिबा, चंदा आणि मोठ्या राणी सरकार त्यांच्या बाजूला बसल्या आहेत. (Jai Jai Swami Samarth Today Episode Promo Colors Marathi READ IN MARATHI)
पहिल्या सीनमध्ये दाजिबा चंदाला सांगतात की सर्व व्यवस्था केली आहे. तसेच वैद्य बुवांना सांगतात आईकडे लक्ष द्या. एक क्षणही दूर होवू नका. तेवढ्यात मालोजी राजेंचा सांगावा येतो. दाजिबा कुठेही जाण्याच्या मनस्थितीत नाही. आई त्यांना सांगते की तुम्ही कर्तव्यावर जा. मालोजी राजे तुम्हांला खूप मानतात.
अधिक वाचा : नवजोडप्यांनी अजय-काजोलच्या नात्यातील या गोष्टी शिकाव्यात
त्यानंतर मोठ्या राणी सरकार चंदाला टोमणा मारता की स्वामी आईंना बरं करतील इतकी शक्ती आहे का त्यांच्यात यावर चंदा निरुत्तर होते.
दुसरीकडे स्वामी एकनाथला शाल आणायला सांगतात, पण सुंदराबाई विरोध करते. पण तरीही स्वामी शाल घेऊन जातात.
तिसऱ्या सीनमध्ये दाजिबाची आई जीव सोडते आणि दाजिबा रडायला लागतात. त्यानंतर स्वामी दाखवले आहे. मग पुढे काय होते हे आजच्या भागात तुम्हांला पाहायला मिळेल.
अधिक वाचा : Chanakya Niti: या मुलींसोबत लग्न केल्यावर मुलांचे रातोरात नशीब उजळते