Bigg Boss Marathi 3 । विशाल आणि जयमध्ये झाली मैत्री...

Bigg Boss Marathi 3 vishal Jay Friendship । बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज होणार आहे जय आणि विशालची मैत्री… आणि ते पण चक्क मीरामुळे... आज दिलेल्या एका टास्कमध्ये काही सदस्यांना शिक्षा म्हणून मुख्य घराबाहेर काढायचे आहे.

jay and vishal Friendship in Bigg boss 3 House
Bigg Boss Marathi 3 । विशाल आणि जयमध्ये झाली मैत्री...  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 37 !
  • “तूच आहेस माझा खरा मित्र” – जय !
  • ते पण चक्क मीरामुळे मित्र झालेत

Friendship in Bigg boss 3 House । मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज होणार आहे जय आणि विशालची मैत्री… आणि ते पण चक्क मीरामुळे... आज दिलेल्या एका टास्कमध्ये काही सदस्यांना शिक्षा म्हणून मुख्य घराबाहेर काढायचे आहे. आणि यावरूनच जय, मीरा आणि विकास यांची मीरासोबत बाचाबाची देखील झाली. पण या शिक्षेमुळेच आता जय आणि विशाल मित्र बनणार का ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. (jay and vishal Friendship in Bigg boss 3 House)

जय, उत्कर्ष, स्नेहा, विशाल आणि विकास यांना मीराने शिक्षेस पात्र ठरवले असून मीराला गाण्याच्या स्वरुपात टोमणे मारणे सुरू आहे. पण, याचनिमित्ताने घरातील सदस्य जरा मज्जा मस्ती करताना दिसले. गाण्याची मैफल रंगली.


 
विकासने उत्कर्षला dialogue सुचवला, में तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था, मेरी कश्ती वहां डूबी, जिस स्विमिंग पूल मै पानी नही था ! त्यावर उत्कर्ष म्हणाला अरे हमे तो हमारे कॅप्टनने लुटा गैरो मै कहा दम था... मीराने त्यावर उत्तर दिले, “मला तुझ्यावर जरासुध्दा हसू येत नाहीये, जे बोलायचे आहे ते बोल तू.” उत्कर्ष म्हणाला, का येईल तिचे आवडते मित्र सगळे खाली तळ्यात आहेत. कसा काय जीव लागेल तिचा. मीरा म्हणाली, सगळे नाहीयेत. त्यावर विकास, उत्कर्ष यांनी गाणं सुरू केलं, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है ... जय विशाल म्हणाला आजपर्यंत तू माझ्यासाठी वेगळा होतास, पण आज तूच आहेस खरा मित्र माझा…
 
अजून काय काय मज्जा केली घरातील सदस्यांनी बागुया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३०. वा. आपली कलर्स मराठीवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी