बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट

जेनिफर विगेंट छोट्या पडद्यावर सर्वात स्टायलिश एक्ट्रेसेसपैकी एक आहे. जेनिफरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात बिकिनी घालून अंडर वॉटर जेनिफर दिसतेय. पाहा तिच्या हॉट अवतारतला व्हिडिओ.

Jennifer Winget
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • टीव्ही एक्ट्रेस जेनिफर विगेंट छोट्या पडद्यावरची नेहमीच चर्चेत असलेली एक्ट्रेस आहे.
  • सोशल मीडियावर जेनिफर विगेंट बरीच पॉप्युलर आहे.
  • जेनिफरचे इंस्टाग्रामवर 8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

टीव्ही एक्ट्रेस जेनिफर विगेंट छोट्या पडद्यावरची नेहमीच चर्चेत असलेली एक्ट्रेस आहे. सोशल मीडियावर जेनिफर बरीच पॉप्युलर आहे. याच माध्यमातून ती आपल्या फॅन्सना प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफबद्दल अपडेट करत असते. जेनिफरचे इंस्टाग्रामवर 8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या स्टायलिश फोटोज आणि व्हिडिओजनी भरलेलं आहे. 

जेनिफरनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जेनिफर अंडर वॉटर दिसतेय. यावेळी एक प्रिटेंड हॉल्टर नेक ब्लू बिकिनीमध्ये जेनिफर भलतीच हॉट दिसत आहे. पाण्याच्या आतमध्ये जेनिफरला कशाचीच तोड नाही. तिचा हा व्हिडिओ तिच्या फॅन्सना भलताच आवडला. तिचे फॅन्स क्लब्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत. व्हिडिओ बघून असं दिसतंय की, जेनिफर सुद्धा अंडर वॉटर सेशन बरंच एन्जॉय करतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@jenniferwinget1 #jenniferwinget #beyhadh #Bepannaah #CodeM

A post shared by ĹӨVĘ=JW.KT (@jennifer.kushal.love) on

दरम्यान लवकरच जेनिफरची पॉप्युलर टीव्ही सीरियल बेहदचा सिक्वेल सिझन 2 येणार आहे. तिनं स्वतःहून सोशल मीडियावर याची घोषणा केली होती. फॅन्स तिच्या या सिक्वेलसाठी खूप उत्सुक आहेत. पहिल्या सिझनमध्ये जेनिफरनं माया नावाची भूमिका पार पाडली होती. ही भूमिका एक ग्रे कॅरेक्टर अशी होती. यात कुशाल टंडन आणि अनेरी विजानी तिच्यासोबत लीड रोलमध्ये होते. जेनिफरचा या सीरियलमधील अवतार याआधी कधी पाहिला नव्हता. अशातच तिची मायाची भूमिका लोकांनी खूप पसंत केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“Here we stand!” ...deep-rooted, strong, fiery and fierce.

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1) on

बेहद 2 मध्ये जेनिफर त्याच भूमिकेत दिसेल, पण बाकी पूर्ण कास्ट बदलली जाईल. एका वेबसाइटनुसार, यात मेल लीडमध्ये दोन स्टार्स शिविन नारंग आणि सिद्धार्थ कार्निक दिसतील. दरम्यान सीरियलच्या टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट Description: जेनिफर विगेंट छोट्या पडद्यावर सर्वात स्टायलिश एक्ट्रेसेसपैकी एक आहे. जेनिफरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात बिकिनी घालून अंडर वॉटर जेनिफर दिसतेय. पाहा तिच्या हॉट अवतारतला व्हिडिओ.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles