Tarak Mehata ka ulta chashma : 'जेठालाल'चा मुलीच्या लग्नात धमाकेदार डान्स, चाहते म्हणाले- दयाबेन सोबत असती तर मजा आली असती

मालिका-ए-रोज
Updated Dec 10, 2021 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jethalal Dance : अभिनेता दिलीप जोशी अर्थातच जेठालाल यांनी मुलीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये धमाकेदार डान्स केला आहे. इन्स्टाग्रामवर एका फॅन क्लबने दिलीप जोशी यांच्या घरचा प्री-वेडिंग फंक्शनचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Dilip Joshi's daughter's pre-wedding function
'जेठालाल' दिलीप जोशी यांचा अफलातून डान्स, प्री-वेडिंग फंक्शन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'तारक मेहता'च्या जेठालाल अर्थातच दिलीप जोशी यांनी मुलीच्या लग्नात धमाकेदार डान्स परफॉर्मन्स केला.
  • दिलीप जोशी यांच्या मुलीच्या प्री-वेडिंग फंक्शनचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर
  • मुलीच्या लग्नात ढोलकी वाजवत नाचतानाचा व्हिडिओ, चाहते म्हणाले दयाबेन असती तर आणखी मजा आली असती.


Tarak Mehata ka ulta chashma : बॉलिवूडमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे, स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय अभिनेते दिलीप जोशी अर्थातच तारक मेहता का उल्टा चश्मामधील जेठालाल मुलीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये धमाकेदार डान्स करताना दिसले. 

इन्स्टाग्रामवर एका फॅन क्लबने दिलीप जोशी यांच्या घरचा प्री-वेडिंग फंक्शनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तारक मेहता का उल्टा चष्माचे जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी त्यांच्या मुलीच्या लग्नाआधीच्या उत्सवात ढोलकी वाजवताना, नाचताना दिसत आहेत.

निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दिलीप जोशी यांच्यासाठी हा त्यांच्या आयुष्यातील मोठा दिवस आहे. वृत्तानुसार, संगीत सेरेमनीच्या रात्री फंक्शनमध्ये सारेच गरबा आणि दांडिया खेळत होते. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिलीप जोशींसोबतच अनेक जण गरबा आणि दांडियाच्या तालावर नाचताना दिसत आहेत. या लग्नात दिलीप जोशी यांनी तारक मेहता का उल्टा चष्माच्या संपूर्ण स्टारकास्टला आमंत्रणही पाठवले आहे.

या व्हिडीओशिवाय दिलीप जोशी त्यांच्या घरी कुटुंबासह पूजा करतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नियती ही त्यांची मोठी मुलगी. मुंबईतील कुलाबा येथील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये लग्न आणि रिसेप्शन होणार आहे.

Dilip Joshi daughter dances Video: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Jethalal Dilip Joshi dances on dhol beats at daughter Niyati Joshi pre- wedding- जेठालाल ने बेटी के प्री-वेडिंग फंक्शन में किया जमकर डांस,

या लग्नाला अनेक सेलिब्रिटी हजर असल्याच्या बातम्या येत असतानाच, दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणी लग्नाला येणार नसल्याची बातमी आहे. मात्र, दिशा त्यांच्या घरी जाऊन वधू-वरांना आशीर्वाद देणार आहे. शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणारा राज अनडकट ही मालिका सोडत असल्याची आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी