कपिल शर्माच्या कार्यक्रमातील कलाकार सुगंधा मिश्रा हिने या विनोदी कलाकाराशी चुपचाप केला साखरपुडा

मालिका-ए-रोज
Updated Apr 18, 2021 | 10:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

कॉमेडी नाईट्स विथ कपिल या लोकप्रिय कार्यक्रमात कपिल शर्मासोबत काम केलेल्या अभिनेत्री सुगंधा मिश्रा हिने आपला बॉयफ्रेंड संकेत भोसले याच्याशी साखरपुडा केला आहे. त्यांनी ही बातमी इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना दिली.

Sugandha Mishra and Sanket Bhosale
कपिल शर्माच्या कार्यक्रमातील कलाकार सुगंधा मिश्रा हिने या विनोदी कलाकाराशी चुपचाप केला साखरपुडा  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • जोडप्याने शेअर केले रोमँटिक फोटो
  • अनेक वर्षांपासून दोघे आहेत एकमेकांसोबत
  • कपिल शर्मा शोमध्येही केले होते एकत्र काम

मुंबई :  Sugandha Mishra and Sanket Bhosale Engagement: जगभरात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे (second wave) सुरू असलेल्या हाहाकारादरम्यान विनोदी अभिनेत्री (comedy actress) सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) हिने आपला बॉयफ्रेंड (boyfriend) संकेत भोसले (Sanket Bhosale) याच्याशी साखरपुडा (engagement) केल्याचे समोर येत आहे. या जोडप्याने (couple) ही बातमी आपल्या इन्स्टाग्रामवरून (Instagram) चाहत्यांना (fans) सांगितली आहे. तसेच या कार्यक्रमाचे काही फोटोही (photos) त्यांनी तिथे शेअर (share) केले आहेत जे प्रचंड व्हायरल (viral) होत आहेत. चाहते या जोडप्याचे भरभरून अभिनंदन (congratulate) करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@sugandhamishra23)

जोडप्याने शेअर केले रोमँटिक फोटो

कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमातून आपल्या विनोदाच्या जोरावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केलेल्या सुगंधा मिश्राच्या चाहत्यांना आता तिच्या आणि संकेत भोसलेच्या विवाहसोहळ्याची उत्सुकता आहे.या दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये आपण पाहू शकता की सुगंधा आणि संकेत एकमेकांसोबत खूपच रोमँटिक दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by . (@drrrsanket)

अनेक वर्षांपासून दोघे आहेत एकमेकांसोबत

सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र सुगंधा किंवा संकेत यांच्यापैकी कुणीही आपल्या नात्याबद्दल जाहीररित्या कोणतेही वक्तव्या केलेले नाही. या जोडप्याला आपले नाते खासगीच ठेवायचे होते. सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र कामही केले आहे.

कपिल शर्मा शोमध्येही केले होते एकत्र काम

काही काळापूर्वीच सुगंधा आणि संकेत भोसले यांनी सुनील ग्रोव्हर यांच्या कॉमेटी शो गँग्स ऑफ फिल्मिस्तान या कार्यक्रमात काम केले होते. याशिवाय सुगंधा आणि संकेत यांनी द कपिल शर्मा शोमध्येही एकत्र काम केले होते. या जोडीच्या विनोदबुद्धीसोबतच त्यांची जोडीही प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीला उतरली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी