मुंबई: कपिल शर्मा(kapil sharma) सोमवारी एअरपोर्टवर दिसला. या दरम्यान कपिल शर्मा व्हील चेअरवर बसला होता. दरम्यान, कपिलचा मूड काही ठीक नव्हता कारण फोटोग्राफर्सना पाहून तो खूप रागात होता. कपिल रागात म्हणतो की चला येथून निघून जा. यानंतर जेव्हा फोटोग्राफर्स जेव्हा बाजूला होतात तेव्हा कपिल म्हणतो, उल्लू के पट्ठे.
कपिलचे हे बोलणे ऐकूम कॅमेरा मन म्हणतात, रेकॉर्ड झालेय सर थँक्यू. आता कपिलच्या या व्हिडिओवर आता यूजर्स त्याचा चांगलेच ट्रोल करू लागले आहेत. कपिल शर्माला इतकी घमेंडी आली. इतका तर कोणत्या मोठ्या स्टारलाही नसतो घमेंड. यश याच्यावर हावी ाले आहे. तर काहींनी कमेंट केली की, कपिलचे पीआर कॉल करून हा व्हिडिओ हटवण्यास सांगतील मात्र तुम्ही हटवू नका. कपिलचेहे रूप साऱ्यांना दिसले पाहिजे.
दरम्यान,कपिलचे चाहते मात्र हे सावरून घेत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की कपिल त्रासात असेल आणि कॅमेरा पाहून तो थोडा चिडला असेल. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माचा शो बंद झाला. दरम्यान, हा शो नेहमीसाठी बंद झालेला नाही. काही काळाच्या ब्रेकनंतर हा शो पुन्हा सुरू होणार आहे. आतापर्यंत कोरोनामुळे शोमध्ये प्रेक्षक नव्हते मात्र जेव्हा शो पुन्हा सुरू होईल तेव्हा प्रेक्षक पुन्हा दिसतील.
काही दिवसांपूर्वी भारती सिंगने एका मुलाखतीत शोबद्दल म्हटले होते, हो आम्ही ब्रेकवर जात आहोत. मात्र काही नवे करण्यासाठी. आम्ही सध्या ब्रेक घेत आहोत ज्यामुळे आम्ही स्वत:ला अपग्रेड करू शको. टीम नव्या व्यक्तिरेखेंवर काम करण्यास उत्साही आहेत. पुढील दोन मिहिन्यात मुश्किलीने एखादा सिनेमा रिलीज होत आहे. यातच चॅनेलने शोला ब्रेक देण्याचा पर्याय निवडला ज्यामुळे आम्ही पुन्हा शोवर काम करू शकू.
गेल्या महिन्यात कपिल दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. कपिलच्या पत्नीने फेब्रुवारीमध्ये मुलाला जन्म दिला. कपिलला आता एक मुलगी आणि एक मुलगा आहे. शो बंद झाल्यानंतर कपिल कुटुंबियांसोबत क्वालिटी टाईम घालवणार आहे.