'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांकडून मारहाण

Karbhari Laybhari serial actress beaten: 'कारभारी लयभारी' या मराठी मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

karbhari laybhari marathi serial actress ganga aka pranit hate beaten in Mumbai bus stop
'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्रीला बस स्टॉपवर अज्ञातांकडून मारहाण  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • 'कारभारी लयभारी' या मराठी मालिकेतील अभिनेत्रीला मारहाण 
  • अज्ञातांकडून अभिनेत्रीला बेदम मारहाण 
  • बस स्टॉपवर उभी असताना मारहाण झाली 

मुंबई : 'कारभारी लयभारी' (Karbhari Laybhari) ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अवघ्या काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील सर्वच कलाकार हे उत्तम अभिनय करत असून मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्रीला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगा ही बस स्टॉपवर उभी असताना अज्ञातांकडून तिला मारहाण झाली. २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या घरी जाण्यासाठी गंगा बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. यावेळी अज्ञातांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी या हल्लेखोरांच्या तावडीतून गंगाने आपली सुटका करुन घेतली. स्वत: गंगा हिने व्हिडिओ पोस्ट करुन घडलेला प्रकार सांगितला आहे.

गंगा हिचं खरं नाव प्रसाद हाटे असे आहे. या मारहाण प्रकरणी मुंबईतील पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर गंगाने रिक्षा पकडून आपलं घर गाठलं. हे हल्लेखोर कोण होते? त्यांनी गंगाला मारहाण का केली? याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये.

व्हिडिओ शेअर गंगाने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. रिक्षातून घरी जात असताना तिने हा व्हिडिओ शूट केल्याचं दिसत आहे. कुठल्याही कारणाशिवाय आपल्याला मारहाण करण्यात आली असून आता काय करायला हवं असा प्रश्नही ती विचारत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी