'कसौटी जिंदगी की २' फेम अनुराग उर्फ पार्थ समथानवर दुखा:चा डोंगर

मालिका-ए-रोज
Updated Apr 20, 2019 | 13:44 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कसौटी जिंदगी की २ फेम अनुराग अर्थात पार्थ समथानच्या वडिलांचे निधन झाले आहे. पार्थ आपल्या वडिलांच्या अतिशय जवळ होता. ही बातमी मिळताच कसौटी जिंदगी की २च्या मालिकेचे शूटिंग कॅन्सल करण्यात आले.

parth samathan
पार्थ समथान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: कसौटी जिंदगी की २ मालिकेतील अनुराग अर्थात पार्थ समथानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. पार्थचे वडील लगाथे समथान यांचे निधन झाले. दरम्यान, या निधनाचे कारण समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पार्थ समथानला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो पुण्याला रवाना झाला होता. Spotboyeच्या रिपोर्टनुसार पार्थच्या वडिलांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. पार्थ वडिलांच्या अतिशय जवळ होता. रिपोर्ट्नुसार तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. 

हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

पार्थच्या वडिलांना गुरूवारी हॉस्पिटमलध्ये दाखल करण्यात आले होते. ते वयोमानानुसार आजाराशी लढत होते. गेल्या रात्री त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान पार्थ शूटिंगमध्ये व्यस्त होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love....beyond words ❤️ #nofilter #maa @pratikgpatil

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan) on

मुंबईत स्वत:चे घर

काही दिवसांपूर्वीच्या पार्थने मुंबईत घर घेतले होते. पार्थने स्वत: याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. पार्थने म्हटले, मुंबईतील माझे पहिले घर. जेव्हा तुम्ही दूर एखाद्या शहरात जेव्हा स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यास जाता तेव्हा तुम्हाला पुन्हा घरीही परतायचे असते. मी खुश आहे की मला माझे स्वप्न साकार करता आले. 

लाईमलाईटपासून दूर आहे पार्थचे कुटुंब

पार्थचे कुटुंब लाईमलाईटपासून दूर असते. कामाच्या बाबत बोलायचे झाल्यास पार्थ सध्या कसौटी जिंदगी की २ या मालिकेत अनुरागची भूमिका साकारत आहे. २०००मधील प्रसिद्ध मालिका कसोटी जिंदगी कीच्या दुसऱ्या हंगामात त्याच्यासोबत एरिका फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. 

पार्थ याआधी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला डेट केले आहे. तसेच पार्थने बिग बॉस ११चा स्पर्धक विकास गुप्तासोबतच्या रिलेशनशिपमुळेही खूप चर्चेत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'कसौटी जिंदगी की २' फेम अनुराग उर्फ पार्थ समथानवर दुखा:चा डोंगर Description: कसौटी जिंदगी की २ फेम अनुराग अर्थात पार्थ समथानच्या वडिलांचे निधन झाले आहे. पार्थ आपल्या वडिलांच्या अतिशय जवळ होता. ही बातमी मिळताच कसौटी जिंदगी की २च्या मालिकेचे शूटिंग कॅन्सल करण्यात आले.
Loading...
Loading...
Loading...