KBC 14 : कविता चावला केबीसी 14 ची पहिली करोडपती, क्रिकेटवरील प्रश्नामुळे हुकले 7.5 कोटी

मालिका-ए-रोज
Updated Sep 23, 2022 | 19:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

KBC 14 : कविता चावला (Kavita Chawala) केबीसी 14 च्या (Kaun Banega Crorepati 14) पहिल्या करोडपती बनल्या आहेत. कविता यांनी 1 कोटी जिंकले मात्र, 7.5 कोटीच्या प्रश्नाचे उत्तर कविताला देता आले नाही. त्या प्रश्नाचे उत्तर माहित नसल्याचे कविता यांनी सांगितले. शेवटचा प्रश्न क्रिकेटशी (Cricket) संबंधित होता. मात्र, कविता यांना क्रिकेटची आवड नाही. त्यामुळे इच्छा असूनही कविता यांनी खेळण्याची रिस्क घेतली नाही.

kaun banega crorepati winner kavita chawla loose 7.5 crore amitabh bachchan
कविता चावला केबीसी 14 ची पहिली करोडपती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कविता चावला केबीसी 14 ची पहिली करोडपती
  • केबीसीच्या मंचावर ऐतिहासिक दिवस
  • न जिंकूनही मी आनंदी - कविता चावला

KBC 14 : कविता चावला (Kavita Chawala) केबीसी 14 च्या (Kaun Banega Crorepati 14) पहिल्या करोडपती बनल्या आहेत. कविता यांनी 1 कोटी जिंकले मात्र, 7.5 कोटीच्या प्रश्नाचे उत्तर कविताला देता आले नाही. त्या प्रश्नाचे उत्तर माहित नसल्याचे कविता यांनी सांगितले. शेवटचा प्रश्न क्रिकेटशी (Cricket) संबंधित होता. 
मात्र, कविता यांना क्रिकेटची आवड नाही. त्यामुळे इच्छा असूनही कविता यांनी खेळण्याची रिस्क घेतली नाही. 

महाराष्ट्रातील कविता चावला कौन बनेगा करोडपती 14 ची पहिली करोडपती झालेली आहे. नीट, आणि व्यवस्थित गेम खेळत कविताने 1 कोटी रुपये जिंकले आहेत. बारावी पास असलेल्या कविताने ज्या मेहनतीने आणि परिश्रमाने अभ्यासाची आवड जपली, त्याला तोड नाही. केबीसीच्या मंचावर ऐतिहासिक विजय मिळवून कविताने एक आदर्श घालून दिला आहे. 

अधिक वाचा : 'ही' अभिनेत्री का भडकली कपिल शर्मावर?

शेवटच्या प्रश्नाचे उत्तर कविता चावला देऊ शकल्या नाहीत

कविता चावला यांनी 1 कोटी जिंकले पण त्या 7.5 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे कविता 7.5 कोटी जिंकण्याची त्यांची संधी हुकली. कविता म्हणतात, शेवटचा प्रश्न क्रिकेटशी निगडीत होता. गुंडप्पाविश्वनाथ यांनी कोणत्या टीमविरोधात डबल सेंच्युरी केली होती? असा प्रश्न होता. ज्याचे उत्तर कविता देऊ शकल्या नाहीत. क्रिकेटची आवड नसल्याने या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहित नव्हते. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता, 1 कोटी जिंकत त्यांनी गेम सोडला. त्यांच्या मते, माहित नसलेल्या प्रश्नाच्या बाबत एवढी मोठी रिस्क घेणं खरंच शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही रिस्क न घेण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटबद्दल आवड नसल्याने त्याच्याशी संबंधित प्रश्नांची उत्तर माहित असणं खरंच कठीण आहे. 


7.5 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, तरीही कविता आनंदी

कविता म्हणाल्या, केबीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच सात कोटी पन्नास लाखांचा प्रश्न माझ्यासमोर आला आहे. यापूर्वी केवळ ७ कोटी रुपयांपर्यंत प्रश्न विचारले जात होते. मी जिंकू शकले नसले तरीही मी आनंदी आहे. 

अधिक वाचा : 'या' 3 राशींचं दिवाळीला फळफळणार नशीब,होणार संपत्तीचा वर्षाव


प्रश्न होता - प्रथम श्रेणी पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय असलेल्या गुंडप्पा विश्वनाथने कोणत्या संघाविरुद्ध ही कामगिरी केली? 

A- सर्विसेस
B- आंध्र
C- महाराष्ट्र
D- सौराष्ट्र

या प्रश्नाचे अचूक उत्तर होते आंध्र. याच प्रश्नावर कविता यांनी क्विट करण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा : तुम्हाला माहितेय रोहित शर्माचं किती झालंय शिक्षण?

इथपर्यंत पोहोचणं कविता यांच्यासाठी खूपच कठीण होते

कविता यांचा 1 कोटी जिंकण्याचा प्रवास खडतर होता. या प्रवासात त्यांना अनेकवेळा असे प्रश्न पडले ज्यामुळे कविता गोंधळात पडल्या. मात्र, आपल्या सद्सद् विवेक बुद्धीचा 
वापर करत कविता यांनी प्रश्नांची उत्तरं दिली. कविता यांच्य ज्ञानामुळे फक्त प्रेक्षकच नाही तर अमिताभ बच्चन यांनासुद्धा इम्प्रेस केले. 1 कोटी जिंकण्याचा कविता यांची इच्छा आणि जिद्द होती. सोशल मीडियावर कविता चावला ट्रेंड करत आहे. लोक त्यांच्या विजयाचे कौतुक करत आहेत. 20 रुपयांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज 1 कोटीपर्यंत येऊन पोहोचलाय. 2000 साली केबीसीला सुरुवात झाल्यापासून त्यांनी केबीसीमध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. अखेर 22 वर्षांनी त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. इतकी वर्ष वाट पाहण्याचं त्यांना फळही गोड मिळालं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी