Big Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात कावेरी-राजवर्धन, आणली ही खास भेटवस्तू

मालिका-ए-रोज
Updated Oct 25, 2022 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

kaveri-rajwardhan: कावेरी आणि राजवर्धन हे बिग बॉस मराठीच्या घराती प्रेक्षकांना भेट देतात तसेच त्यांना दिवाळीनिमित्त खास भेटवस्तूही देतात.

big boss marathi
बिग बॉसच्या घरात कावेरी-राजवर्धन, आणली ही खास भेटवस्तू 
थोडं पण कामाचं
  • राजवर्धन आणि कावेरी हे दोघेही बिग बॉसच्या स्पर्धकांना भेटायला आले होते.
  • दोघांनीही स्पर्धकांच्या भेटीगाठी घेतल्या.
  • दरम्यान, यावेळी दिवाळीनिमित्त त्यांनी माहेरचा चहाही दिला.

मुंबई: देशभरात दिवाळीचा(diwali) सण साजरा होत आहे. त्यात बिग बॉसचे(big boss) घर कसे काय मागे राहील. बिग बॉसच्या घरातही दिवाळी साजरी होत असून या निमित्ताने नवे पाहुणे या घराला भेट देतायत. ते दुसरे तिसरे कोणी नसून भाग्य दिले तू मला या मालिकेतील राजवर्धन आणि कावेरी आहेत. kaveri and rajwardhan in big boss marathi house for diwali celebration

राजवर्धन आणि कावेरी हे दोघेही बिग बॉसच्या स्पर्धकांना भेटायला आले असून ते दिवाळीनिमित्त त्यांच्यासाठी भेटवस्तूही घेऊन येतात.

राज आणि कावेरी यांना पाहून बिग बॉसचे स्पर्धकही खूप खुश झालेत. राज आणि कावेरी या सगळ्यांसाठी माहेरचा चहा असा लिहिलेला कप भेटवस्तू देतात. 

दम्यान, कावेरी आणि राजवर्धन बिग बॉस मराठीच्या घरात आल्यावर काय काय धमाल उडते हे सर्व तुम्हाला आज 25 ऑक्टोबरच्या भागात घडताना दिसणार आहे.

कलर्स मराठीवर तुम्ही रात्री 10 वाजता हे पाहू शकता. बिग बॉसच्या घरात दररोज काही ना काही नाट्यमय घडत असते. तसेच बिग बॉस मराठीच्या घरात अक्षय आणि तेजस्विनीमध्ये प्रेमाचा गुलमोहर फुलत असल्याचाही व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

 त्याआधीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांसाठी मुंबईचे डब्बेवाले काही खास खाऊ घेऊन आले होते. त्यांनी या सर्वांसाठी प्रेक्षकांनी पाठवलेला प्रेमरूपी फराळ आणला होता.

यावेळी बिग बॉस मराठी प्रेक्षकांनी आपल्या घरच्यांना मिस केलेच त्यासोबतच फराळ खाताना घरच्या दिवाळीची त्यांना आठवणही झाली. काहीजण भावूक झालेले पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी