बिग बॉस मराठीच्‍या घरात नवीन फिटनेस कोच, किशोरी शहाणे देत आहेत व्यायामाचे धडे

मालिका-ए-रोज
Updated Jun 11, 2019 | 10:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi's new fitness coach: किशोरी शहाणे या घरात अनेकदा योगासने करताना दिसतात. याच योगसनाचे धडे त्यांनी अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईकला दिले आहेत. या योगासनाचे धडे तरी ऐकतात का हे दोघं ते पाहा.

Kishori becomes new fitness trainer to Digamber and Bichukale inside Marathi Bigg Boss
बिग बॉस मराठीच्‍या घरात नवीन फिटनेस कोच, किशोरी शहाणे देत आहेत व्यायामाचे धडे 

मुंबई: बिग बॉस मराठी 2च्‍या घरामध्‍ये पहिली एन्ट्री झाली ती 80चं दशक गाजवलेल्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांची. त्यांच्या दिमाखदार एन्ट्रीने सीझनची सुरुवात तर धमाल झालीच पण घरातल्या त्यांच्या वावरातून आणि खेळातून सिझनची रंगत पण तितकीच वाढत आहे. त्यात त्यांचा ग्लॅमरस लूक म्हणजे सोने पे सुहागा असंच म्हणावं लागे. किशोरी या त्यांच्या फिटनेसबद्दल असलेल्‍या निष्‍ठेसह आपल्‍याला प्रभावित करण्‍यासाठी कोणतीच कसर सोडत नाही.  अनेकदा त्या गार्डन एरियामध्ये योगा करताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या एका 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये या ५१ वर्षीय अभिनेत्री दिगंबर नाईक आणि अभिजीत बिचुकले यांना प्राणायाम शिकवताना दिसत आहेत.

सकाळच्या वेळेस दिगंबर व बिचुकले गार्डन एरियामध्‍ये बसून गप्‍पा मारताना दिसतात आणि तेवढ्यात त्‍यांना किशोरी त्यांची नियमित योगासने करताना दिसतात. यावर दिगंबर त्यांना हाक मारतो आणि म्‍हणतो, ''बाहेर सोडायचं ना ते..?'' आपल्या योगासनांबद्दल असं बोलल्यावर किशोरी या त्याचे फायदे सांगितल्या शिवाय राहतील तरंच नवल. किशोरी लगेचच त्‍याच्‍याजवळ बसून त्‍याला योगासनांची पद्धत व सूचना सांगण्‍याचा प्रयत्‍न करताना दिसतात आणि शिकवताना म्हणतात, ''श्‍वास बाहेर सोडायचा असतो, करूया का?''

किशोरी यांनी पटवून दिसेल्या योगासनाचे फायदे बहुदा दिगंबरला पटले, त्यामुळे त्याने लगेच ते करायला सुरुवात केलेली दिसते. किशोरीसोबत दिगंबर योगा करताना दिसतो खरा पण पहिल्‍यांदा दिगंबरला सराव करताना अस्‍वस्‍थ वाटते. तो किशोरीला त्‍याची पत्‍नी कशाप्रकारे योगा करते हे देखील सांगतो पण त्‍याला त्‍याची फारशी आवड नसल्‍याचे सुद्धा सांगतो. पण अखेर तो किशोरी यांच्यासाठी योगासन करण्‍याचे मान्‍य करतो. ती व दिगंबर योगासन करत असताना किशोरी बिचुकलेंना सुद्धा त्‍यांच्‍यासोबत सामील होण्‍यास सांगतात आणि म्‍हणतात, ''हे तुम्‍ही करू शकता, पाय दुखत असतील तरी.'' झोपाळ्यावर निवांत झोके घेत असलेले बिचुकले सुद्धा लगेच उठतात आणि त्यांच्या सुचनांचे पालन करताना दिसतात. तसंपण बिचुकले कायम किशोरी यांना त्यांचं आयडॉल म्हणत असतात त्यामुळे त्यांच्या आयडॉलने त्यांना सांगितलेली गोष्ट ते कशी टाळतील म्हणा. शिवाय किशोरी शहाणे ज्यांनी एक काळ मोठ्या पडद्यावर राज्य केलं आहे अशा ग्लॅमरस अभिनेत्रीसोबत वर्कआऊट करण्याची संधी कसं बरं कोण सोडेल? खासकरुन बिचुकले तर नाहीच नाही. तर अखेर बिचुकले आणि दिगंबर या दोघांना पटवून योगासनं करायला लावण्यात किशोरी यशस्वी ठरल्या. असंच या फिटनेस क्रांतीमध्ये इतर कोणाचा समावेश होतो का ते पहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठीच्‍या घरात नवीन फिटनेस कोच, किशोरी शहाणे देत आहेत व्यायामाचे धडे Description: Bigg Boss Marathi's new fitness coach: किशोरी शहाणे या घरात अनेकदा योगासने करताना दिसतात. याच योगसनाचे धडे त्यांनी अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईकला दिले आहेत. या योगासनाचे धडे तरी ऐकतात का हे दोघं ते पाहा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles