शो मस्ट गो ऑन म्हणत, किशोरी शहाणेंनी सांगितली 'त्या' परफॉर्मन्सची आठवण

मालिका-ए-रोज
Updated Jun 19, 2019 | 21:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Show must go on says Kishori with sad memory: शो मस्ट गो ऑन असं नेहमी म्हंटलं जातं, हेच वाक्य महेश मांजरेकरांनी या विकेन्डला बिग बॉसमध्ये वापरलं. त्यामुळे किशोरी यांची याच वाक्यावरुन एक भावनिक आठवण ताजी झाली.

Kishori Shahane shares an emotional memory of her father in Bigg Boss Marathi 2 house
शो मस्ट गो ऑन म्हणत, किशोरी शहाणेंनी आपल्या सगळ्यात भावनिक परफॉर्मन्सची सांगीतली आठवण 

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात नुकत्याच पार पडलेल्या विकेन्डच्या डावात बरंच काही घडताना दिसलं. घरातली एक स्ट्राँग स्पर्धक असलेल्या शिवानी सुर्वेवर कारवाई करत घरातून बाहेर काढलं गेलं. यावेळी होस्ट महेश मांजरेकर यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण त्यांचं एक वाक्य फार महत्तवाचे होतं आणि ते म्हणजे, द शो मस्ट गो ऑन. हे वाक्य अनेकदा वापरलं जातं खासकरुन कलाकारांच्या बाबतीत या वाक्याचा प्रयोग अनेकदा केला जातो. हे वाक्य ऐकताच हाडाच्या कलाकार असलेल्या घरातल्या सिनिअर स्पर्धक किशोरी यांना त्यांच्या आयुष्यातला एक भावनिक क्षण आठवला. वूटवरील अनसीन अनदेखाच्या एका क्लिपमध्ये यावर व्यक्त होताना किशोरी दिसल्या.

शो मस्ट गो ऑन या वाक्याचं किशोरी यांच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण त्यांच्या आयुष्यातला एक अतिशय हळवा क्षण त्या वाक्याशी जोडलेला आहे. वूटच्या या क्लिपमध्ये विद्याधर म्हणजेज बाप्पा आणि सुरेखा यांच्यासोबत निवांत गप्पा रंगल्या. या गप्पा रंगल्या असताना किशोरी यांना त्यांच्या आयुष्यातील भावनिक प्रसंग आठवला आणि त्या म्हणाल्या, “माझे बाबा ज्यादिवशी गेले त्यादिवशी माझा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये परफॉर्मन्स होता. आय रिमेम्बर ते आयसीयूमध्ये होते लास्ट स्टेजवर, मी त्यांना सांगितलं की मी तुमच्याबरोबर राहणार पण ते मला म्हणाले की 'द शो मस्ट गो ऑन!' तू जायचंस आणि परफॉर्म करायचास. मी त्यांच ऐकलं आणि ज्यादिवशी माझे बाबा गेले त्यादिवशी मी परफॉर्म केलं”.

किशोरी यांनी घेतलेला हा धीट निर्णय ऐकून कोणाला ही त्यांचा अभिमानं वाटेल. अशा परिस्थितीत परफॉर्म करणं ते सुद्धा चेहऱ्यावरचं दुःख लपवत ही काय छोटी गोष्ट नाहीये. किशोरी यांची ही आठवण ऐकून बाप्पा आणि सुरेखा सुद्धा भावूक झालेले दिसले. किशोरी यांनी पुढे या आठवणीचा उल्लेख करत त्याबद्दल अजून खुलून सांगायला सुरुवात केली आणि त्या म्हणाल्या, “सगळ्यांना वाटलं होतं माझा तो परफॉर्मन्स कॅन्सल होईल पण मी परफॉर्म केलं माझ्या बाबांच्या बोलण्यावर. सचिन पिळगावकर यांना अवॉर्ड मिळालेला त्याच दिवशी, त्यांनी स्टेजवर मला ट्रिब्यूट दिला की सिन्सॅरिटी आणि अॅज अॅन अॅक्टर शो मस्ट गो ऑन काय असतं याची मिसाल किशोरी शहाणे आहे! त्यांना माझा हा ट्रिब्यूट की त्यांचे बाबा गेले तरी त्यांनी परफॉर्म केलं आणि महेश मांजरेकर यांनी पन सॅल्यूट केलं. २ वर्ष झाली बाबांना जाऊन आता, बट आय स्टिल रिमेंबर दॅट डे”

जेव्हा महेश मांजरेकरांनी हे वाक्य शोमध्ये वापरलं त्या दिवशी किशोरी यांना काय वाटलं असेल याची कल्पना ही करता येणार नाही. 'शो मस्ट गो ऑन' या वाक्याचा खरा अर्थ किशोरी यांच्या सारखे कलाकार खऱ्या अर्थाने पटवून देतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शो मस्ट गो ऑन म्हणत, किशोरी शहाणेंनी सांगितली 'त्या' परफॉर्मन्सची आठवण Description: Show must go on says Kishori with sad memory: शो मस्ट गो ऑन असं नेहमी म्हंटलं जातं, हेच वाक्य महेश मांजरेकरांनी या विकेन्डला बिग बॉसमध्ये वापरलं. त्यामुळे किशोरी यांची याच वाक्यावरुन एक भावनिक आठवण ताजी झाली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles