Kitchen kallakar : आता कलाकारांची वाजणार शिटी, मनोरंजनाची चव आणखी वाढणार; झी मराठीवर रंगणार 'किचन कल्लाकार'

Kitchen kallakar : झी मराठीवर लवकरच किचन कल्लाकार हा नवाकोरा कार्यक्रम सुरू होतोय. अभिनेते प्रशांत दामले या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता संकर्षण क-हाडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

'Kitchen kallakar' Zee marathi's new show
झी मराठीवर पुन्हा एकदा रंगणार प्रशांत दामलेंची खवय्येगिरी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • झी मराठीवर नवा शो 'किचन कल्लाकार'
  • अभिनेते प्रशांत दामले परीक्षकाच्या भूमिकेत
  • कोणत्या कलाकारांचा किचनमध्ये लागणार कस?


Kitchen kallakar : खवय्ये म्हटल्यावर एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. प्रशांत दामले हे एक खवय्या सुद्धा आहेत आणि त्यांची हीच खवय्येगिरी आता प्रेक्षक झी मराठीवर पुन्हा एकदा पाहू शकणार आहेत. लवकरच किचन कल्लाकार हा नवाकोरा कार्यक्रम झी मराठीवर सुरू होतोय. अभिनेते प्रशांत दामले या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता संकर्षण क-हाडे या 
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. 

 
झी मराठीवर 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा प्रोमो नुकताच समोर आलाय. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार.पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार आहे. आता हे कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. 

या शोचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेते प्रशांत दामले. आता नेमकी त्यांची भूमिका काय आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर या कार्यक्रमात प्रशांत दामले हे परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत. कुठले कलाकार पाककलेचे शिवधनुष्य पेलू शकले याचा अंतिम निर्णय हा प्रशांत दामले घेणार आहेत. 
त्यामुळे कलाकारांना आता खवय्या प्रशांत दामले यांना आपल्या पाक-कौशल्याने प्रभावित करणं किती कठीण जाणार जाणार आहे हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.

दरम्यान, नुकताच सएक नवा प्रोमो समोर आलाय, आणि या प्रोमोमध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत दिसत आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने  भल्याभल्याची झोप उडवणारी तुमची आमची निर्मिती ताई अर्थातच निर्मिती सावंत अभिनयकौशल्यानंतर आता आपल्या पाककौशल्याने प्रेक्षकांसोबतच परीक्षकांचही मन जिंकणार का कळेलच. आता फक्त एकाच कलाकाराचा प्रोमो समोर आलाय आता अजून कोण कोण कलाकार किचनमध्ये कल्ला करणार याचीच उत्सुकता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी