स्क्रूच्या मदतीने घुसवण्यात आले होते भीष्म पितामहांच्या शरीरात बाण

मालिका-ए-रोज
Updated May 11, 2020 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाभारतात भीष्म पितामह यांना बाणांच्या गादीवर झोपवण्यात आले होते. भीष्म पितामह यांची भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांनी या सीनच्या शूटिंगचा किस्सा सांगितला.

mukesh khanna
स्क्रूच्या मदतीने घुसवण्यात आले होते भीष्म पितामहांच्या शरीरात बाण  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • महाभारतात भीष्म पितामह बाणांच्या गादीवर झोपले होते.
  • मुकेश खन्ना यांनी सांगितले, कशा प्रकारेच बाण त्यांच्या शरीरातून आर पार गेले होते
  • महाभारतानंतर मुकेश खन्ना ते सर्व बाण आपल्या घरी घेऊन गेले होते.

मुंबई: दूरदर्शनवर पुन्हा एकदा महाभारत दाखवले जात आहे. या महाभारतात सध्या कौरव-पांडवांचे युद्ध सुरू आहे. तर भीष्म पितामह युद्धाच्या १०व्या दिवशी बाणांच्या गादीवर झोपले आहेत. भीष्म पितामहची भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्नांनी या सीनच्या शूटिंगचा मोठा खुलासा केला.

मुकेश खन्ना यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत मुकेश खन्ना सांगतात, प्रत्येक बाण माझ्यावर तारेने सोडण्यात आला. प्रत्येक बाणाला मी पकडले. पुढे अर्धे आणि मागे अर्धे बाण माझ्या ड्रेसच्या आत जे स्क्रू द्वारे लावण्यात आले होते. त्यानंतर दिवसभर बाण चालवले जात होते.

मुकेश खन्ना म्हणाले, आम्ही एक एक तीराचा शॉट घेतला होता. मला प्रत्येक बाण लागण्याच्या वेळेस माझे हावभाव बदलायचे होते. त्यावेळेस स्पेशल इफेक्ट नव्हते. त्यामुळे एक सीन शूट होण्यास बराच वेळ लागत असे.

मानेवर आली होती खूण

मुकेश खन्ना म्हणाले, माझी शूटिंग रात्री ११ वाजता होत असे. ती सकाळी चार वाजेपर्यंत शूटिंग सुरू राहत असे. मी अनेकदा बाणांच्या गादीवर तीन तीन तास झोपून राहत असे. जोपर्यंत इर्मजन्सी येत नाही तोपर्यंत मी उठत नसे, मी आकाशात तारे मोजत असे.

तसेच बाणांच्या गादीवर झोपताना माझ्या डोक्याखाली मात्र कोणताही आधार नव्हता. बराच वेळ शूटिंग सुरू राहत असल्याने माझ्या मानेवर निशाण आले होते. दरम्यान, हे निशाण ठीक झाले.

बाणांची गादी घरी घेऊन गेले होते मुकेश खन्ना

मुकेश खन्ना म्हणाले, महाभारत संपल्यानंतर ते बाणांची गादी आपल्या घरी घेऊन गेले होते. त्यांनी याबाबत रवी चोप्रा यांना विचारले की ते ही गादी घरी घेऊन जाऊ शकतात. यावर रवी चोप्रा म्हणाले, ही तर तुझीच आहे. २७ वर्षांपर्यंत मी ते बाण फॅक्ट्रीमध्ये सांभाळून ठेवले होते. त्यानंतर मी ऑफिसमध्येही घेऊन येत असे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी