होस्ट नागराज मंजुळेंनी केली 'कोण होणार करोडपती'च्या प्रीमिअरची तारीख जाहीर

मालिका-ए-रोज
Updated May 15, 2019 | 13:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kon Honaar Crorepati Premiere: कोण होणार करोडपतीची प्रतीक्षा प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. नागराज मंजुळे होस्ट म्हणून दिसणार हे कळल्यावर तर शोची उस्तुकता अधिक ताणली गेली. अखेर शोच्या प्रीमिअरची तारीख जाहीर झालीय.

Kon Honaar Crorepati the Marathi KBC is all set to return announces the host himself Nagraj Manjule
होस्ट नागराज मंजुळेने केली कोण होणार करोडपतीच्या प्रमिअरची तारीख जाहीर  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: कोण होणार करोडपती  म्हणजेच मराठी केबीसीच्या तिसऱ्या सिझनची प्रतीक्षा प्रेक्षकांना बरेच दिवस लागून राहिली आहे. यंदा होस्टच्या खुर्चीत राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे दिसणार असं मध्यंतरी जाहीर झालं आणि शोची उत्सुकता अधिक ताणली गेली. नागराजची लोकप्रियता प्रचंड आहे त्यामुळे शोला त्याचा फायदा होणारे हे काय वेगळं सांगायला नको आणि याचाच वापर करत शोच्या होस्टकडूनच शोच्या प्रीमिअरची तारीख जाहीर केली गेली. नागराजनं त्यांच्या सोशल मीडियावरून कोण होणार करोडपतीच्या तिसऱ्या सिझनच्या प्रीमिअरची तारीख जाहीर करत शोच्या फॅन्सना दिलासा दिला. येत्या 27 मे पासून अखेर शो ऑन एअर जाणार असून सोमवार ते गुरूवार रोज रात्री 8.30 वाजता सोनी मराठीवर शोचं प्रसारण होणार आहे असं जाहीर करण्यात आलं आहे.

 

 

 

नागराजच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर बराच उत्साह पहायला मिळाला. नागराजने पोस्ट शेअर करत प्रसिद्ध कवी राहत इदौरी यांच्या ‘गुलाब ख़्वाब दवा ज़हर जाम क्या-क्या है, मैं आ गया हूँ बता इन्तज़ाम क्या-क्या है !’ या ओळी कॅप्शन म्हणून लिहिल्या. याशिवाय “माझे प्रश्न आणि तुमची उत्तरं, सुरू होत आहेत 27 मेपासून !, बघायला विसरू, नका 'कोण होणार करोडपती', सोमवार ते गुरूवार, रात्री 8.30 वाजता, फक्त सोनी मराठीवर!” असं सुद्धा लिहिलं. त्यांच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नागराजच्या होस्टिंगची उस्तुकता प्रचंड आहे. त्यामुळे या सगळ्यामुळे शोचा प्रीमिअर एकदम धमाकेदार होणार हे निश्चित. शोच्या पहिल्या दोन पर्वाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या पर्वात अभिनेता सचिन खेडेकर होस्टच्या खुर्चीत दिसले तर दुसऱ्या पर्वाला मराठीतला लाडका चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी होस्ट म्हणून दिसला होता. दोन्ही पर्वांची लोकप्रियता तिसऱ्या सिझनच्या कामी नक्कीच येईल.

 

 

 

 

 

योगायोगाने, हिंदी केबीसीचा चेहरा असलेल्या बिग बी अमिताभ बच्चनसोबत नागराज झुंड हा हिंदी सिनेमा करत आहे. या सिनेमाने हिंदी दिग्दर्शनात तो पदार्पण करत असून नुकतंच या सिनेमाचं शूट आटपलं आहे आणि याच शूट दरम्यान नागराजला कोण होणार करोडपती होस्ट करण्याची ऑफर आली. त्यामुळे या नव्या होस्ट नागराजला मुरलेल्या होस्ट बिग बींकडून काही टिप्स मिळतात का ते पहावं लागेल. सध्या शोवर जोरदार काम सुरू असून, शोचे प्रोमो सुद्धा जोरदार सुरू आहेत. नागराज सुद्धा या नव्या इनिंग्ससाठी फारच उस्तुक असल्याचं त्याच्या पोस्टमधून अगदी सहज दिसत आहे. नागराजचं फॅन फोलोविंग, त्यात शोची लोकप्रियता बघता कोण होणार करोडपतीचं हो तिसरं सीझन एकदम धमाकेदार असेल असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी