Kushal Badrike : "असं कोण वागतं यार?"... कुशल बद्रिकेच्या 'त्या'पोस्टमुळे एकच चर्चा..

मालिका-ए-रोज
Updated Aug 28, 2022 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रीकेची (Kushal badrike post) पोस्ट सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. इंस्टाग्रामवर कुशल बद्रिकेने (Kushal badrike) त्याच्या पत्नीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सगळ्यांच्याचच चर्चेचा विषय ठरतोय. नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये? कुशलची ती पोस्ट इतकी का चर्चेत आहे जाणून घेऊया.

Kushal Badrike Video on Social media
पत्नीच्या 'त्या' गोष्टीवर कुशलनं केलं React  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कुशल बद्रिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
  • कुशलच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट आणि मजेशीर कमेंट्स
  • हवा येऊ द्या या रिएलिटी शोमुळे कुशल बद्रिके लोकप्रिय

Kushal Badrike Social media post: स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या (chala hava yeu dya ) या कार्यक्रमातून कुशल बद्रिके (Kushal badrike)  हे नाव घराघरात पोहोचलं. परफेक्ट कॉमेडी सेन्स, हजरजबाबीपणा यामुळे अल्पावधीतच कुशलने आपली दखल घ्यायला प्रेक्षकांना भाग पाडलं. कुशल नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियाद्वारेही तो प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. कुशल सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहे. काही ना काही व्हिडिओ, एखाद्या गोष्टीबद्दल स्वत: मत, तर कधी पत्नी आणि मुलासोबतचे मजेशीर व्हिडिओसुद्धा कुशल शेअर करतो. ( Kushal Badrike post wife dance video on Social Media )

आताही त्याने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. कुशलचा हा व्हिडिओ (Kushal badrike post) सध्या सोशल मीडियावर साऱ्यांचच लक्ष वेधून घेत आहे. कुशलचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कदाचित तुमच्यासोबत असा प्रसंग घडल्याचं आठवतंय का बघा. 

अधिक वाचा : रॅम्पवर अभिनेत्रींसोबत घडलंय असं काही...

कामाच्या बिझी शेड्युलमधून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा कुशल आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. आताही कुशल त्याच्या पत्नीसोबत प्रवास करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र प्रवासादरम्यान तो ट्रॅफिक जाममध्ये अडकला. यावेळी त्याच्या कारमध्ये 'प्यार किया तो डरना क्या' हे गाणं सुरू होतं. कुशलच्या बायकोने कारमध्येच ती या गाण्यावर बसल्या बसल्या डान्स करू लागली. बायकोचा हा गाडीमधला डान्स पाहून कुशलला तिचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने बायकोचा डान्स करतानाचा व्हिडिओ काढला आणि चक्क सोशल मीडियावर शेअर केला. 

व्हिडिओ शेअर करत त्यासोबतच कुशलने एक पोस्टही लिहिलेली आहे. तो म्हणतो, "प्रवास म्हटलं की ट्रॅफिक लागणारच, त्यात वेळ जात नाही म्हणून असं कोण वागतं यार.
तुमचा वेळ जातो ओ… इथे आमचा जीव…. जाऊ दे चल आता तो विषय नको."

अधिक वाचा : Hrithik Roshan च्या विनम्रतेपुढे फॅन्सही झुकले

एकूणंच काय तर कुशलचा हा व्हिडिओ पाहून तुमच्यापैकी काही जणांना आपल्यासोबत असं घडल्याचं आठवलं तर नाही ना...कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी