KKK: खतरों के खिलाड़ी-11च्या दमदार 8 स्पर्धकांची यादी, निक्की तंबोली, अभिनव शुक्लानंतर राहुल वैद्यही सहभागी

मालिका-ए-रोज
Updated Apr 10, 2021 | 13:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Khatron Ke Khiladi 11 New List 8 Celebrities: खतरों के खिलाड़ीच्या आगामी पर्वातील स्पर्धकांच्या यादीबाबत एक नवी माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत रोहित शेट्टीच्या या कार्यक्रमसाठी 8 नावे निश्चित झाली आहेत.

Khatron Ke Khiladi contestants
खतरों के खिलाड़ी-11च्या दमदार 8 स्पर्धकांची यादी, निक्की तंबोली, अभिनव शुक्लानंतर राहुल वैद्यही सहभागी 

थोडं पण कामाचं

  • खतरों के खिलाडी आपल्या आगामी पर्वामुळे आहे चर्चेत
  • या पर्वातील स्पर्धकांबाबतची एक नवी माहिती आली समोर
  • बिग बॉस 14चा उपविजेता राहुल वैद्य स्पर्धकांमध्ये सहभागी

खतरों के खिलाड़ी (Khatron Ke Khiladi) हा कार्यक्रम आपल्या आगामी पर्वामुळे (upcoming season) सध्या चर्चेत आहे. नुकतीच यातील स्पर्धकांबाबत (contestants) एक नवी बातमी (latest news) समोर आली आहे. खतरों के खिलाडीच्या 11व्या पर्वात (11th season) दुसरा तिसरा कुणी नाही तर बिग बॉसच्या 14व्या (Bigg Boss 14) पर्वाचा उपविजेता (runner-up) राहुल वैद्यही (Rahul Vaidya) सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अशीही बातमी येत होती की तो आपली गर्लफ्रेंड (girlfriend) दिशा परमारसोबत (Disha Parmar) नच बलिए (Nach Baliye) या नृत्याच्या कार्यक्रमात (dance show) सहभागी होणार आहे, कारण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनीही (producers) त्याच्याशी संपर्क साधला होता. मात्र राहुलने खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल वैद्यच्या लोकप्रियतेचा कार्यक्रमाला होणार फायदा

खतरों के खिलाडीशी संबंधित एका सूत्राने सांगितले आहे, 'आम्ही बिग बॉस 14 संपल्यानंतर काही आठवड्यानंतरच राहुलशी संपर्क साधला होता. त्याच्या पाठीला दुखापत झाली होती आणि या कार्यक्रमात येऊन स्टंट केल्याने परिस्थिती आणखी बिघडणार नाही याची त्याला खात्री करून घ्यायची होती, त्यामुळे गोष्टी मागेपुढे होत होत्या. बिग बॉस 14मध्ये दर्शकांनी त्याला खूप पसंती दर्शवली होती आणि खतरों के खिलाडीमध्ये तो आल्याने एक जास्त फायदा होईल.'

ही बॉलिवुड गायिकाही दिसणार खतरों के खिलाडीमध्ये

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही खतरों के खिलाडीच्या आगामी पर्वातील स्पर्धकांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याची आणि त्यासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या पर्वात डीजे बाबूची प्रसिद्ध गायिका आस्था गिलही दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी