लॉकडाऊनचा मोठा फटका, १० टीव्ही शो बंद होण्याच्या मार्गावर

Lockdown affect on TV shows: लॉकडाऊनचा मोठा फटका टीव्ही इंडस्ट्रीला बसल्याचं दिसत आहे. कारण, आतापर्यंत काही टीव्ही शोज बंद करण्यात आले आहेत.

lockdown affect tv industry some popular shows daily soaps to go off air entertainment news marathi
लॉकडाऊनचा मोठा फटका, १० टीव्ही शो बंद होण्याच्या मार्गावर 

थोडं पण कामाचं

  • कोरोनाचा फटका टीव्ही इंडस्ट्रीला 
  • कोरोना संकटात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक प्रसिद्ध टीव्ही शोज बंद 
  • बंद करण्यात आलेल्या शोजमध्ये 'नागिन ४' पासून 'बेहद २' यांचा समावेश 

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम टीव्ही इंडस्ट्रीवर झाला आहे. लॉकडाऊनमुले टीव्ही इंडस्ट्रीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. टीव्ही शो बनवणाऱ्या मेकर्सने अनेक लोकप्रिय शोज बंद केले आहेत. तर इतरही शोज बंद करण्याच्या मार्गावर आहेत. टीव्ही शोज बंद झाल्यामुळे आता बऱ्याच कलाकारांची मोठी अडचण झाली आहे. लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद झाल्याने काही खासगी चॅनल्सने आपल्या जुन्या लोकप्रिय टीव्ही मालिका आणि शोजचं पुन्हा प्रसारण करण्यास सुरूवात केली. 

पण कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुधारलेली नाहीये. सुरूवातीला टीव्ही इंडस्ट्रीला वाटले होते की, लवकरच सर्वकाही ठिक होईल आणि पुन्हा लवकरच शूटिंग सुरू होईल पण जसजसा वेळ वाढत गेला तसतस अडचणी आणखी वाढत गेल्या. पाहूयात या लॉकडाऊनमुळे कोणत्या टीव्ही मालिका आणि शोजला फटका बसला आहे.

'बेहद २' पासून 'नागिन ४' बंद 

रोमँटिक थ्रिलर 'बेहद २' एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय शो होता. पहिल्या सीजननंतर दुसरा सीजन सुद्धा खूप लोकप्रिय झाला. मात्र, चॅनलने हा शो मध्येच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एकता कपूरचा प्रसिद्ध शो 'नागिन ४' बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 'पटियाला बेब्स' सुद्धा चॅनलने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'इश्क शुभान अल्लाह' या शोने टीआरपीमध्ये चांगले नंबर्स मिळवले मात्र, हा शो सुद्धा बंद होण्याचं वृत्त समोर येत आहे. मोनालिसा स्टारर 'नजर २' शो नुकताच सुरू झाला होता. मात्र हा शो सुद्धा लॉकडाऊनमुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'दिल ये जिद्दी है' आणि 'इशारो इशारों में' शोज बंद 

'दिल ये जिद्दी है' सुरूवातीपासूनच टीआरपीच्या लिस्टमध्ये काही खास प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर आता लॉकडाऊन झाल्यावर चॅनलने कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 'इशारो इशारों में' हा कार्यक्रम सुद्धा मध्येच थांबवावा लागला आहे. 'दिल जैसे धडके धडकने दो' या कार्यक्रमाला सुद्धा लॉकडाऊनचा फटका बसला आहे. निर्मात्यांनी 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ ना' हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राजश्री प्रोडक्शन निर्मित हा शो शेवटपर्यंत चालला नाही.

लॉकडाऊनमुळे 'कार्तिक पौर्णिमा' शोला सुद्धा मोठा फटका बसला आहे. हा कार्यक्रम बंद झाल्याच्या वृत्ताला अभिनेत्री पौलमी दाने दुजोरा दिला आहे. याशिवाय 'ये जादू हैं जिन्न का' कार्यक्रमाला फटका बसला आहे कारण, लॉकडाऊनमुळे चॅनलने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी