Man Vs Wild मधील निवदेक बेयर ग्रिल्सचं शाकाहारी जेवणाला असतं No; नेहमी Non-veg वर असतो ताव

Man Vs Wild टीव्हीच्या जगातील सर्वात यशस्वी कार्यक्रमांपैकी (Program) एक आहे. या कार्यक्रमाचे होस्ट बेअर ग्रिल्सला (Host Bear Grylls) प्रत्येकजण ओळखतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (Former President of America) बराक ओबामा (Barack Obama), भारताचे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi), बॉलिवूड (Bollywood) अभिनेता (Actor) अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रणवीर सिंग यांसारखे प्रसिद्ध लोक त्यांच्या शोचा भाग बनले आहेत.

Bear Grylls hits on a non-vegetarian meal, such is the diet
बेयर ग्रिल्स मांसाहारी जेवणावर मारतो ताव, असा आहे डाएट   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • Man Vs Wild शो होस्ट बेअर ग्रिल्सला आवडतो मांसाहार
  • बेअर ग्रिल्स व्यवस्थित डाएटसह व्यायाम करतो.
  • Man Vs Wild शो मध्ये बराक ओबामा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अक्षय कुमार, रणवीर सिंग देखील आले आहेत.

Bear Grylls Diet Plan: Man Vs Wild टीव्हीच्या जगातील सर्वात यशस्वी कार्यक्रमांपैकी (Program) एक आहे. या कार्यक्रमाचे होस्ट बेअर ग्रिल्सला (Host Bear Grylls) प्रत्येकजण ओळखतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (Former President of America) बराक ओबामा (Barack Obama), भारताचे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi), बॉलिवूड (Bollywood) अभिनेता (Actor) अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रणवीर सिंग यांसारखे प्रसिद्ध लोक त्यांच्या शोचा भाग बनले आहेत.

पण आज आपण या शोबद्दल नाही तर शोच्या होस्ट अर्थात बेअर ग्रिल्सच्या आहाराबद्दल बोलणार आहोत. शो दरम्यान साप आणि विंचू खाणारा बेअर ग्रिल्सने अलीकडेच त्याच्या एका मुलाखतीत त्याच्या आहारासह अनेक गोष्टींबद्दल सांगितले आहे. बिझनेस इनसाइडरच्या मते, बेअर ग्रिल्स शाकाहारी होता पण आता तो फक्त मांसाहार जेवण करत असतो.

बेअर ग्रिल्सा आवडतात मांसाहारी पदार्थ 

बेअर ग्रिल्सने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, 'मी माझ्या आहारात लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि फळे खातो. मी ड्राय फ्रुट्स, धान्य आणि भाजीपाला खाण्याच्या विरोधात आहे.' त्याने सांगितले की दुपारच्या जेवणात तो मांस, अंडी, लोणी आणि फळे खातो. याशिवाय ते प्रत्येक इतर दिवशी यकृताचे मांस खातात. आठवड्यातून एक किंवा दोनदा तो पिझ्झा किंवा तळलेले पदार्थ खातो. तो म्हणतो कधी-कधी मी आता कच्चे मांसदेखील खातोय.   

Read Also : जालियनवाला बागेतील विहीरीत नाही दिसणार पैसा, जाणून घ्या का?

एडवेंचर ट्रिपवरुन आल्यानंतर खातो हे खाद्यपदार्थ 

याशिवाय जेव्हा बेअर ग्रिल्स साहसी सहलीवरून घरी येतो तेव्हा तो आधी घरी जातो आणि बर्गर खातो. ते त्यांच्या बर्गरमध्ये चीज आणि अंडी देखील घालतात. यासोबत, बेअर ग्रिल्स एक चमचा बोन मॅरो, ग्रीक दही, मध आणि बेरी खातात. यानंतर संत्र्याचा रस देखील तो पीत असतो.  तो रोज व्यायाम देखील करतो, असं देखील त्याने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. व्यायाम प्रकारात तो धावत नाही तर कार्डिओसाठी टेनिस खेळतो. यासोबतच तो वेट ट्रेनिंग आणि योगाही करतो, असे त्याने मुलाखतीवेळी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी