Subodh Bhaves Post : सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टनं सगळ्यांनाच विचार करण्यास पाडलं भाग, कोणतं 'जुनं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने... ?'

मालिका-ए-रोज
Updated Jul 25, 2022 | 17:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Subosh Bhave Post : अभिनेता सुबोध भावे ( Subodh Bhave) मराठी नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता. सुबोध भावेने नुकतीच त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट (Instagram post ) शेअर केली. त्याच्या या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. आता सुबोधच्या पोतडीतून काय बहारदार पाहायला मिळणार याकडे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीचंही लक्ष लागलं आहे.

Subosh Bhaves Post goes Viral
सुबोध भावेची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेता सुबोध भावेची इंस्टाग्राम पोस्ट मोठ्या प्रमणात व्हायरल
  • सुबोधच्या त्या फोटोने साऱ्यांचीच उत्सुकता वाढवली
  • सुबोधच्या पोतडीतून आता कोणती कलाकृती जन्म घेणार?

Subosh Bhave Instagram Post : मराठी नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीतील आघाडीचं नाव म्हणजे सुबोध भावे  ( Subodh Bhave) होय. सुबोधने आपल्या अभिनयाने कायम प्रेक्षकांच्या मनावर त्याची एक वेगळी छाप सोडलेली आहे. नाटक किंवा सिनेमा करताना नेहमीच चोखंदळ असलेल्या सुबोधने प्रेक्षकांच्या मनावर एक ठसा उमटवलेला आहे. त्यातच आता सुबोध भावेच्या या नव्या पोस्टने (Instagram post ) साऱ्यांचच लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ( Marathi Actor Subosh Bhave Instagram Post goes Viral)

या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत सुबोध भावेच्या  ( Subodh Bhave) हातात स्क्रीप्ट दिसत आहे. त्याने या फोटोला दिलेल्या  कॅप्शनने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे. या फोटोतल्या कॅप्शनमध्ये 'एक जुनं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने.....', असं फोटो शेअर करत सुबोध भावेने म्हटलं आहे.


या फोटोतल्या कॅप्शनने त्याच्या चाहत्यांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनाही विचार करण्यास नक्कीचं भाग पाडलं असणार. हे नक्की काय कोडं आहे? कोणतं जुनं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आहे? सुबोध लेखक म्हणून समोर येणार का? आता सुबोधच्या पोतडीतून काय बहादार पाहायला मिळणार? असे नानाविध प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत. चाहते सुबोधच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स करत आहेत. काहींनी सुबोधला नव्या वाटचालीबद्दल, प्रोजेक्टबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी कोणतं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे याची आम्हालाही उत्सुकता असल्याचं
म्हटलं आहे. 

अधिक वाचा : पापाराझीवर संतापला अर्जुन कपूर, Video व्हायरल; म्हणाला...

आजपर्यंत सुबोध भावेने  ( Subodh Bhave) मराठी मालिका आणि मराठी सिनेमातून एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता अशी सुबोधची ओळख आहे. आता 'बस बाई बस' हा कार्यक्रम घेऊन सुबोध भावे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहे. 29 जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात महिला कलाकार सहभागी होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी