Suyash Tilak | अभिनेता सुयश टिळक अपघातातून थोडक्यात बचावला!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याच्या भोवती चर्चेचे वादळ घोंगावत आहे.  ब्रेकअपची चर्चा, नंतर सोशल मीडियाला गुडबाय म्हणणारा सुयश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

marathi actor suyas tilak cab meet with accident actor safe posted on social media
Suyash Tilak | अभिनेता सुयश टिळक अपघातातून थोडक्यात बचावला!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak)ाच्या भोवती चर्चेचे वादळ घोंगावत आहे.
  • वैयक्तिक आयुष्यात ब्रेकअपची चर्चा, नंतर सोशल मीडियाला  रामराम ठोकणारा सुयश एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे.  
  •  दोन दिवसांपूर्वी सुयशने सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्या चाहत्यांचे आभार मानले होते.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak)ाच्या भोवती चर्चेचे वादळ घोंगावत आहे.  वैयक्तिक आयुष्यात ब्रेकअपची चर्चा, नंतर सोशल मीडियाला  रामराम ठोकणारा सुयश एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे.  दोन दिवसांपूर्वी सुयशने सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्या चाहत्यांचे आभार मानले होते. त्याचबरोबर मी सुखरूप असल्याचे देखील म्हटले होते. मात्र, सुयशच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांना नेमकं काय घडलं, हा प्रश्न पडला होता.  

 मिळालेल्या माहितीनुसार सुयश टिळक हा ज्या कॅबमधून  जात होता, त्या गाडीचा मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले होते. रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पहाटे सुयश हा स्वतःच्या गाडीने न जाता कॅबने प्रवास करत होता. परंतु, रस्त्यावर अंधार असल्याने मालवाहतूक करणाऱ्या गाडीने सुयशच्या कॅबला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, कॅब रस्त्याच्या कडेला उलटून पडली होती. अपघातावेळी गाडीत चालक आणि सुयश दोघेच होते.

थोडक्यात बचावला सुयश!

भीषण अपघात होऊन देखील सुयशचे नशीब चांगले होते, म्हणून ड्रायव्हर आणि सुयश, दोघांनाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सुयश स्वतः कॅबबाहेर आलाच, पण त्याने ड्रायव्हरला देखील बाहेर काढून माणुसकीचे दर्शन घडविले. या दुर्घटनेत गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

सुयशच्या अपघाताची माहिती त्याच्या चाहत्यांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली आहे. सर्वजण चिंतेत असलेले पाहून सुयशने स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याचे सांगितले. ‘देव दयाळू आहे व जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे’, असे पोस्ट करीत सुयशने काळजी करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

सुयशच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

नुकतीच सुयशने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने प्रेम करण्याव्यक्तीबद्दल आणि या खास नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. एखाद्यावर प्रेम केले, तर ते निस्वार्थी असावे, आपल्या जोडीदाराच्या कठीण काळात त्याच्या पाठिशी उभे राहायला हवे, याबद्दल अनेक गोष्टी त्याने लिहिल्या होत्या. त्याचं ब्रेकअप झाल्याचीही चर्चा होती. 

सुयशने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती. या पोस्टमध्ये त्याने अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून सुयशच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे?, असा प्रश्न विचारला जात आहे. या बद्दल आता सगळेच काळजीत आहेत.

सोशल मीडियाला रामराम?

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाला रामराम म्हटले होते. काही दिवसांपूर्वी त्याने एक पोस्ट शेअर खलील जिब्रान यांचा एक कोट शेअर केला होता. ‘ऑफलाइन इज द न्यू लक्झरी’, असे त्याने त्यात म्हटले होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी