Ratris Kehl Chale Shevanta: रात्रीस खेल चाले २मधलं शेवंताचं नवीन रूप सत्य की भास?

मालिका-ए-रोज
Updated Sep 05, 2019 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

रात्रीस खेळ चाले २ ही मालिका सध्या वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. सध्या मालिकेत अण्णा पहिल्यांदाच तुरूंगात बंद आहेत. तर शेवंतासुद्धा वेगळ्याच रूपात दिसली आहे, या सगळ्यामागे नेमकं काय आहे ते वाचा सविस्तर.

marathi serial ratris khel chale shevanta new look creates a stir
Ratris Kehl Chale Shevanta: रात्रीस खेल चाले २मधलं शेवंताचं नवीन रुप सत्य की भास? 

थोडं पण कामाचं

  • रात्रीस खेळ चाले २ मालिकेत येणार विलक्षण वळण
  • अण्णांसोबत जेलमध्ये भास-आभासाचा खेळ सुरु
  • शेवंताचं नवीन रुप सत्य की भास?

मुंबई: रात्रीस खेळ चाले २ ही मालिका फार कमी वेळात प्रेक्षक पसंती मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. तसंच दुसऱ्या पर्वाला सुद्धा मिळताना दिसतोय. मालिकेचं कथानक आणि त्यातली पात्र फार हिट ठरत आहेत. पहिल्या पर्वाच्या आधीचा भाग म्हणजेच प्रिक्वेल म्हणून रात्रीस खेळ चाले २ भेटीला आली आणि बघता-बघता आता प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न आणत आता मालिका एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेतलं हे वळण नेमकं काय घडवणार ते पाहुयात.

मालिकेत नुकतंच अण्णांकडून शोभावर गोळी झाडली गेलेली दिसली. त्यामुळे पोलिसांनी अण्णांना पकडून नेलं आहे. सध्या मालिकेत अण्णा तुरूंगात बंद असलेले दिसत आहेत. कोर्ट बंद असल्यामुळे आण्णांना जामिन सुद्धा मिळाला नाहीय. तर दुसरीकडे शोभाच्या साक्षीवर अण्णांची सुटवा अवलंबून आहे. शोभा दवाखान्यात गेली असून तिची सासू वच्छीला पूर्ण खात्री आहे की आता अण्णांना कायमची अडकण्यासाठी ती यशस्वी ठरली आहे. पण शोभा मात्र तिच्या अपेक्षांवर पाणी टाकत अण्णांच्या विरोधात साक्ष देणार नाही असं समजतंय. तर इथे तुरुंगात असलेल्या अण्णांना मात्र भास आभासाचे खेळ सतावत आहेत. त्यांना विविध भास होताना दिसत आहेत आणि त्यातच एन्ट्री होते शेवंताची.

 

 

शेवंताची एन्ट्री पाहुन सगळ्यांच्याच भुवया उंचावतात कारण ही शेवंता नेहमीच्या वेशात नसून एका वेगळ्याच रुपामध्ये दिसते. शेवंता गेले अनेक दिवस आजारी होती. अण्णांने रघू काकांकडून दिलेल्या औषधाचा दुष्परिणाम झाला आणि शेवंताच्या चेहऱ्यावर फोड येऊ लागले. त्यानंतर तर सुंदर दिसणारी शेवंता पार कुरुप दिसत होती. म्हणूनच अण्णांनी पण शेवंताकडे पाठ फिरवली होती. पण आता पोलीस स्टेशनमध्ये अवतरलेली शेवंता मात्र आधीपेक्षाही अधिक सुंदर आणि मादक रुपात अवतरली. ते पाहुन अण्णांना धक्काच बसला.

 

 

अण्णांना होणारे तुरुंगातले भास आणि त्यात शेवंताचं हे रुप, हे सगळं पाहुन अण्णा चाट पडतात. त्यात शेवंता अण्णांशी फारंच प्रेमाने बोलताना दिसते. त्यांना ती नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी सुद्धा सांगते. आता सध्याची परिस्थिती बघता शेवंता अण्णांवर चिडली असणार हे नक्की पण तरीही ती पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटायला आलेली दिसते. त्यात ती त्यांना घरी यायला सुद्धा सांगते आणि तिच्या चेहऱ्यावरचे कुरुप डाग सुद्धा इतक्या लवकर कसे गेले हा सुद्धा एक प्रश्न आहेच. या सगळ्याकडे बघता शेवंताचं हे नवीन रुप हा अण्णांच्या भासांचा खेळ तर नसेल? अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे हा सगळा नेमका काय प्रकार आहे आणि यातून मालिकेत कोणतं विलक्षण वळण येणार आहे ते पाहणं रंजक ठरेल हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Ratris Kehl Chale Shevanta: रात्रीस खेल चाले २मधलं शेवंताचं नवीन रूप सत्य की भास? Description: रात्रीस खेळ चाले २ ही मालिका सध्या वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. सध्या मालिकेत अण्णा पहिल्यांदाच तुरूंगात बंद आहेत. तर शेवंतासुद्धा वेगळ्याच रूपात दिसली आहे, या सगळ्यामागे नेमकं काय आहे ते वाचा सविस्तर.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO
मिलिंद नार्वेकरांशी फोनवरून चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी केले मोठे वक्तव्य 
मिलिंद नार्वेकरांशी फोनवरून चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी केले मोठे वक्तव्य 
[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु
[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट
अरं अरं... खतरनाक... प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत
अरं अरं... खतरनाक... प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत
[VIDEO] MeTooचे आरोपी सुभाष कपूर सोबत काम करण्यात आमिर खान तयार, समोर आले हे कारण 
[VIDEO] MeTooचे आरोपी सुभाष कपूर सोबत काम करण्यात आमिर खान तयार, समोर आले हे कारण 
आधी ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना 
आधी ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना 
[VIDEO] काय आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लकी चार्म, सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ 
[VIDEO] काय आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लकी चार्म, सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ