‘साथ दे तू मला’च्या सेटवर जंगी पार्टी, अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्या वाढदिवसाचं निमित्त

मालिका-ए-रोज
Updated Apr 22, 2019 | 15:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

‘साथ दे तू मला’ मालिका काही काळातंच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेचे कलाकार पडद्यावर तर धमाल करत आहेतंच पण त्याचसोबत पडद्यामागे सुद्धा एक जंगी सेलिब्रेशन या टीमने साजरं केलं. ते सेलिब्रेशन होतं एका खास वाढदिवसाचं.

Marathi serial Saath De Tu Mala Celebrate senior actress Savita Prabhune’s birthday on sets
सविता प्रभुणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘साथ दे तू मला’च्या सेटवर झाली जंगी पार्टी 

मुंबई: ‘साथ दे तू मला’ ही मालिका सुरु होऊन अवघे काही दिवस लोटले असले तरी या काही काळातंच मालिकेला बरीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे. सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात व्यस्त असलेल्या मालिकेच्या टीमने काही क्षण ब्रेक घेत एक जंगी पार्टी मालिकेच्या सेटवर साजरी केली. हे जंगी सेलिब्रेशन होतं ते अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. खास केकचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आणि सविता प्रभुणे यांना ह्याची पुसचटची सुद्धा कल्पना नव्हती. शूटमध्ये व्यस्त असलेल्या मालिकेच्या संपूर्ण टीमने मग सविता यांना खास सरप्राईज दिलं आणि जल्लोषात केक कापला गेला. ‘साथ दे तू मला’च्या टीमकडून मिळालेलं हे खास सरप्राईज पाहून सविता ताई भारावून गेल्या होत्या. त्यांचा आनंद या क्षणी टिपलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah) on

‘साथ दे तू मला’ या मालिकेत आशुतोष कुलकर्णी सविता ताईंच्या मुलाची म्हणजेच समीर ही व्यक्तिरेखा साकारतोय. पडद्यावरची ही आई खऱ्या आयुष्यातही आम्हाला आईप्रमाणेच आहे अशी भावना आशुतोषने या वेळी व्यक्त केली. तो पुढे म्हणाला की, “सविता ताई आम्हा सर्व कलाकारांवर भरभरुन प्रेम करतात. त्यांचा सल्ला आमच्या नेहमी कामी येतो. त्यांच्या एनर्जीचं आम्हा सर्वांनाच विशेष कौतुक वाटतं. शूटिंग लांबलं तरी त्यांच्या उत्साहामध्ये तसुभरही कमतरता नसते. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच इच्छा मी व्यक्त करतो.” या आणि अश्या खूप गोड शुभेच्छा मालिकेच्या संपर्ण टीमकडून त्यांच्या लाडक्या सविता ताईंना दिल्या गेल्या.

Marathi serial Saath De Tu Mala Celebrate senior actress Savita Prabhune’s birthday on sets

 

Marathi serial Saath De Tu Mala Celebrate senior actress Savita Prabhune’s birthday on sets

लवकरच लग्न होऊ घातलेल्या जोडप्याची ही गोष्टी सध्या रंजक वळणं घेत आहे. घरच्या परिस्थितीला हातभार लावावा म्हणून तान्ह्या मुलाला घरी सोडून नोकरी करणाऱ्या आईची प्रांजळ ईच्छा की, आपल्या येणाऱ्या नवीन सुनेने आता नोकरी करु नये आणि घराला कुटुंबाला वेळ द्यावा. पण अतिशय होतकरु असलेली ही नवीन सून नोकरी सोडून घर सांभाळणार का? आणि आई-बायको या दोघींमधला दुवा असलेला नायक सगळं कसं सावरुन नेणार या सगळ्यावर बेतलेली मालिका ‘साथ दे तू मला’ सध्या पडद्यावर तर चांगली रंगत आहेच पण त्याचसोबत पडद्यामागे सुद्धा मालिकेची टीम सेटवर अशा सेलिब्रशनने छान रंगत आणत आहे. पुढे मालिकेत अजून काय रंजक वळणं येतात ते जाणून घेण्यासाठी पाहायला विसरु नका ‘साथ दे तू मला’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘साथ दे तू मला’च्या सेटवर जंगी पार्टी, अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्या वाढदिवसाचं निमित्त Description: ‘साथ दे तू मला’ मालिका काही काळातंच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेचे कलाकार पडद्यावर तर धमाल करत आहेतंच पण त्याचसोबत पडद्यामागे सुद्धा एक जंगी सेलिब्रेशन या टीमने साजरं केलं. ते सेलिब्रेशन होतं एका खास वाढदिवसाचं.
Loading...
Loading...
Loading...