Rama-Madhav Wedding: स्वामिनी मालिकेत रंगणार रमा-माधवचा विवाहसोहळा!

मालिका-ए-रोज
Updated Oct 21, 2019 | 23:23 IST | चित्राली चोगले

रमा-माधव यांच्या प्रेमकथेचा इतिहास खूप मोठा आहे. त्यांच्या कथेला नव्याने अनुभवायला मिळतंय ते स्वामिनी मालिकेतून. रमा-माधव यांच्या या कथेची आता खऱ्या अर्थाने होणारे कारण लवकरच मालिकेत रमा-माधवचा विवाह रंगणार आहे

marathi serial swamini to witness the wedding of rama and madhav soon
Rama-Madhav Wedding: स्वामिनी मालिकेमध्ये रंगणार रमा-माधवचा विवाहसोहळा! 

थोडं पण कामाचं

  • स्वामिनी मालिकेत रंगणार पेशवाईतला खास विवाहसोहळा
  • अखेर रमा-माधव लग्नबंधनात अडकणार
  • इतिहासातील गाजलेल्या रमा-माधवच्या प्रेम कहाणीची सुरुवात

मुंबई: १६व्या दशकातील पेशवाईमधील एक महत्त्वाचा अध्याय होता रमा-माधव यांची प्रेमकहाणी. एक साधारण मुलगी रमा पासून ते रमाबाई ही पेशवाईमधील महत्त्वाची पेशवीणबाई होण्याचा प्रवास पेशवाईच्या इतिहासात खूप महत्त्वाचा ठरला. हाच १६व्या शतकातील काळ आणि रमा-माधवचा इतिहास सध्या छोट्या पडद्यावर रंगत आहे तो स्वामिनी मालिकेतून. ही मालिका सुरु होऊन काहीच दिवस उलटले असले तरी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. त्यातही छोटीशी रमा म्हणजेच श्रृष्टी पगारेची फार चर्चा आहे. तसंच या रमाची खंबीर सासू म्हणजेच गोपिकाबाई जी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी साकारली आहे ती सुद्धा तितकीच लोकप्रिय ठरली आहे. मालिकेत बरेच चढ-उतार आल्यावर आता एक आनंदाचा क्षण मालिकेत अनुभवायला मिळणार आहे. अखेर मालिकेत रमा-माधवचा विवाहसोहळा रंगणार आहे.

सगळ्या अडचणींना, परीक्षांना पार करून आता शिवाजी जोशी यांची कन्या म्हणजेच रमाची लग्नगाठ पेशवे माधवराव यांच्याशी बांधली जाणार आहे. शनिवारवाडा अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी ठरला, अनेक सोहळे त्याने पाहिले, पेशव्यांच्या सुखात सहभागी झाला आणि दु:खात खंबीरपणे तठस्थ उभा राहिला. हाच शनिवारवाडा साक्षी होता एका विलक्षण प्रेमकहाणीचा. रमा आणि माधवची प्रेमकहाणी याच शनिवारवाड्यात बहरली. या वाड्यात लहानगी रमा लग्न होऊन आली आणि संपूर्ण पेशवाईला एक वेगळीच कलाटणी मिळाली जणू.

रमा–माधवच्या लग्नसोहळ्याबद्दल आपण बरेच ऐकून आहोत पण आता तो प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे. पेशवाई थाटमाट, सनई चौघडे, रोषणाई असं सगळं होत. एक दिमाखदार सोहळ्यामधून रमा आणि माधव लग्न बंधनामध्ये बांधले जाणार आहेत. शनिवारवाडा आणि संपूर्ण पेशवाई सज्ज आहे रमा-माधवचे स्वागत करण्यासाठी. त्यांचा विवाहसहळा नव्याने अनुभवण्यासाठी आणि इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी. लवकरच स्वामिनी मालिकेमध्ये हा विवाहसोहळा रंगताना दिसणार आहे आणि प्रेक्षकांना त्यामध्ये सामिल होता येणार आहे. तेव्हा नक्की बघा स्वामिनी सोमवार ते शनिवार आणि रविवारी सुध्दा रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर.

रमा-माधवच्या लग्नानंतर काय?

रमा आणि माधवचं लग्न तर छान पार पडेल पण मग पुढे या दोघांच्या आयुष्यात काय होणार ते पहावं लागेल. रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले. आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पडेल? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील? हे सगळं बघणं उत्सुकतेचे असणार आहे. रमा-माधव यांची नावं सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरली गेली आहेत. माधवरावांचे रमावर असलेले अपार प्रेम, रमाबाईंनी केलेला त्याग याला पेशवाई साक्ष आहे. रमा–माधव यांच्या या कथेला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. यांचा हा प्रवास कसा होता? त्यांना कोणाची साथ लाभली? गृह कलह, घरातील राजकारण हे असतानाच रमाने पेशवाईचा भार कसा सांभाळला या नव्या अध्यायाचं साक्षी आता प्रेक्षकांना व्हायला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी