Marathi Serial Raksha Bandhan: छोट्या पडद्यावरील या तीन कुटुंबात 'असा' रंगणार रक्षाबंधनाचा सण

मालिका-ए-रोज
Updated Aug 14, 2019 | 20:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

छोट्या पडद्यावरील मालिका प्रत्येकाच्या घरातला एक अविभाज्य घटक बनल्यात. या मालिकेतली कुटुंब म्हणजे आपल्या अगदी परिचयाची झालीत. रक्षाबंधनाचा सण छोट्या पडद्यावरील अशाच आपल्या या लाडक्या कुटुंबामध्ये साजरा होणारयं

marathi small screen serials balu mamachya navane chaang bhala he mann bavare and ghadge and sunn rakshabandhan special
Marathi Serial RakshaBandhan: छोट्या पडद्यावरील या तीन कुटुंबात असा रंगणार रक्षाबंधनाचा सण 

थोडं पण कामाचं

  • छोट्या पडद्यावरील तीन कुटुंबातील रक्षाबंधन सोहळा
  • हे मन बावरे, बाळूमामाच्या नावानं चांग भलं आणि घाडगे अॅण्ड सूनमध्ये असं साजरं होणार रक्षाबंधन
  • छोट्या पडद्यावरील तीन लाडकी कुटुंब जल्लोषात साजरा करणार रक्षाबंधनाचा सण

मुंबई: दैनंदिन मालिका आपल्या प्रत्येकाच्या घरातला एक भाग बनल्या आहेत आणि त्यातली कुटुंब आपल्याला फार जवळची सुद्धा वाटतात. याच आपल्या लाडक्या कुटुंबांपैकी तीन कुटुंबामध्ये रक्षाबंधनाचा सण कसा साजरा होणार आहे ते पाहुयात. रक्षाबंधन म्हणजे प्रत्येक भाऊ-बहिणीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. भाऊ-बहिणीच्या नात्यातली वीण अधिक घट्ट करणारा हा सण. आपल्या घरात जसा हा सण अगदी मनापासून साजरा होतो तसाच हा आपल्या लाडक्या मालिका बाळू मामाच्या नावानं चांग भलं, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि घाटगे अॅण्ड सूनमध्ये साजरा होताना दिसणार आहे.

बाळू मामाच्या नावानं चांगभलं

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये बाळूमामा सध्या गंगीकडे गेलेले दिसले. तर तिथेच हा सण साजरा होईल आणि गंगी बाळूमामांना राखी बांधताना दिसेल. बाळू सत्यवाच्या लग्नापासून गंगी आणि बाळूच्या नात्यात ताण आला होता. त्यानंतरही गंगीचा सांभाळ करण्यासाठी घरच्यांमुळे बाळूला अक्कोळ सोडून याव लागलं. हा राग बाळूच्या मनात आहेच. पण गंगी- बाळू मधल्या ह्या वादावर रक्षाबंधांनाच्या गोड क्षणांनी पडदा पडणार आहे. सगळा राग विसरून अखेर भाऊ-बहीण पुन्हा नव्याने नात्यातला ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. बाळूमामा गंगीला धीर देत सत्यवाची काळजी करू नकोस असे, सगळे नीट होईल पांडूरंगाचे नामस्मरण कर असा मोलाचा सल्ला देणार आहेत आणि असं होत हे भाऊ बहिण पुन्हा एकत्र येताना दिसतील.

सुखाच्या सरींनी हे मन बावरे

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये नुकतेच अनु आणि सिद्धार्थ लग्न पार पडलं. अनुचा गृहप्रवेश झाल्यानंतर आता लग्नानंतरचा पहिला सण अनुसाठी रक्षाबंधन असणार आहे. त्यामुळे दुर्गा अनुकडे ईच्छा व्यक्त करणार आहे की तिने यावर्षीचे रक्षाबंधन तत्ववादीच्या घरी साजरं करावं. ज्याला अनु निश्चितंच होकार देताना दिसेल. म्हणूनंच दीक्षित कुटुंब पहिल्यांदाच तत्ववादींच्या घरी येणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनासोबतंच या घरात अजून काय घडतं ते पहाणं रंजक ठरणार आहे.

घाडगे अॅण्ड सून

घाडगे अॅण्ड सून मालिकेमध्ये काही महिन्यांपासून बर्‍याच घडोमोडी घडत आहेत. भाग्यश्रीने अमृतावर असलेल्या विश्वासाखातर बाळाला सांभाळण्याची खूप मोठी जबाबदारी अमृतावर सोपावली आहे. यामुळेच घाडगे सदनात नवं गोड नात निर्माण होणार आहे. आजवर अमृताने घाडगे कुटुंबातल्या अनेक व्यक्तींना मायेने आपलसं करून घेतलंय. त्यामुळे या नात्यात सुद्धा ती तितकीच माया लावेल हे नक्कीच. पण अमृताने घाडगे सदनमध्ये पाऊल ठेवल्यापासून अनंतच्या मनात अमृताबद्दल अढी आहे. परंतु अमृता घेत असलेली बाळाची काळजी अनंतला अखेर दिसून आली. यामुळेच यावर्षी अमृताने आपल्याला राखी बांधावी अशी ईच्छा अनंतने अमृताजवळ व्यक्त केली. नकळतपणे एका नात्याला जोपासताना अमृताला अजून एक प्रांजळ नातं घरात सापडलं आहे. त्यामुळे अनंताचा मान ठेवत अमृता यावर्षी त्याला राखी बांधणार आहे. “मी बाळाची आणि आईची भेट घडवून आणेल आणि ही माझ्याकडून माझ्या भावाला भेट असेल” असे याक्षणी अमृता अनंतला वचन देताना सुद्धा दिसेल.

एकंदरीत या तिन्ही कुटुंबात हा रक्षाबंधनाचा क्षण अनेक आनंदाचे क्षण आणत अनेक नात्यांमधला गोडवा दृढ करणार हे नक्की.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...