Mouni Roy bold photoshoot : मौनी रॉयचं हॉट आणि बोल्ड फोटोशूट, बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या

मालिका-ए-रोज
Updated Dec 12, 2021 | 20:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mouni Roy hot photoshoot : मौनी रॉयने नुकतेच हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिने फोटोज पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडताना दिसत आहे.

 Mauni Roy's hot and bold photoshoot broke all the boundaries of boldness
मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटोशूट, लाईक्सचा वर्षाव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मौनी रॉयचं हटके फोटोशूट, सिझलिंग अदा
  • मौनी आणि हॉट & सिझलिंग फोटोशूट
  • मौनीची दिलखेचक अदा, चाहतेही घायाळ


Mouni Roy hot and bold photoshoot : नवी दिल्ली: छोट्या पडद्यापाठोपाठ बॉलीवूडमध्येही धुमाकूळ घालणारी मौनी रॉय (Mouni Roy) आजकाल तिचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करून लोकांची झोप उडवत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, आता ती आपल्या स्टाईलने लोकांना मंत्रमुग्ध करत आहे. 

मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

आता मौनी  (Mouni Roy) तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनी  (Mouni Roy) समुद्राच्या मध्यभागी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड पोज देत आहे. अभिनेत्री पुन्हा परफेक्ट बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. मौनीने पुन्हा एकदा बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत

मौनी झोपाळ्यावर झुलताना दिसली

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

फोटो शेअर करताना मौनीने राल्फ वाल्डो इमर्सनचा एक कोट शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे की, “Live in the sunshine, swim the sea, drink the wild air.” फोटोंमध्ये ती समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा झुल्यावर झुलत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सिझलिंग दिस आहे. मौनीने  (Mouni Roy) एकत्र अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.


मौनीवरून नजर हटतच नाही

आता अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीत. काही तासांत मौनीच्या  (Mouni Roy) या पोस्टवर एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. दुसरीकडे, लोकं कमेंट बॉक्समध्ये सतत प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे मौनीच्या या फोटोंवरून नजर हटवणे कठीण झाले आहे.


या फिल्म्समुळे मौनी चर्चेत आहे


मौनी  (Mouni Roy) च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ती बऱ्याच दिवसांपासून अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र'च्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी